कणकवली : विद्यामंदिर इंग्लिश मिडीयम प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांचा शारीरिक तसेच मानसिक विकास व्हावा, म्हणून दिनांक ४ जानेवारी २०२५ या रोजी योग प्रात्यक्षिक सत्र आयोजित केले होते. विद्यार्थ्यांना योग प्रात्यक्षिक सत्रासाठी डॉ. शमिता बिरमोळे यांचे मार्गदर्शन लाभले. सदर योग प्रात्यक्षिक सत्रासाठी विद्यामंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक डॉ. पी. जे. कांबळे त्याचबरोबर विद्यामंदिर प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक अच्युत वनवे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

सत्राची सुरुवात विद्यामंदिर इंग्लिश मीडियम प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. दिव्या सावंत यांनी त्यांच्या मनोगतातून केली. त्यांनी विद्यार्थ्यांना नियमित योगा करण्याचे महत्त्व सांगितले. यानंतर डॉ. शमिता बिरमोळे यांनी योगाविषयी मार्गदर्शन केले. सुरुवातीला त्यांनी योग म्हणजे काय?, त्याचबरोबर अष्टांग योग म्हणजे काय? हे सांगितले. त्याचबरोबर योगाची उत्पत्ती कुठून झाली याविषयी त्या बोलल्या. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक दाखवण्यापूर्वी व करून घेण्यापूर्वी त्यांनी विद्यार्थ्यांकडून योगा करण्यापूर्वीच्या प्रार्थना म्हणून घेतल्या व त्या प्रार्थनांचा अर्थ समजावून सांगितला.
यानंतर त्यांनी प्रात्यक्षिके दाखवून ती प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांकडून करून घेतली.त्याचबरोबर विद्यार्थ्यांकडून मेडिटेशन देखील करून घेतले. शेवटी त्यांनी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात भरपूर खेळले पाहिजेत त्याचबरोबर आपल्या दैनंदिन जीवनात रोज योगा केला पाहिजेत असा महत्त्वाचा सल्ला दिला. त्याचबरोबर योगाचे आपल्याला होणारे फायदे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. यानंतर विद्या मंदिर इंग्लिश मीडियम प्रशालेचे क्रीडा शिक्षक आनंद सुतार यांनी योग मार्गदर्शक डॉ. शमिता बिरमोळे तसेच योगा सत्रासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे आभार मानले.
ADVT –



