Wednesday, October 29, 2025

Buy now

spot_img

भाजपला मत म्हणजे देशाच्या विकासाला मत.! : मंत्री नितेश राणे. ; कोलगाव येथे भाजपा सदस्यता महाअभियान व नोंदणी कार्यक्रमाचा शुभारंभ.

सावंतवाडी : भाजपला मत म्हणजे देशाच्या विकासाला मत. त्यामुळे अशा मतदारांना भारतीय जनता पक्षाचे सदस्य करुन घ्या, असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केले. भारतीय जनता पक्षाला नेहमी मतदान करुन जे विजय मिळवून देतात, ते सर्व भाजपचे मतदार आहेत. ते कायम आपल्या पाठीशी उभे आहेत, असं विधान त्यांनी केलं. कोलगाव ग्रामपंचायत येथे रविवारी भाजपा सदस्यता महाअभियान शुभारंभ व नोंदणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

या महाअभियानाचा शुभारंभ मत्स व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झाला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, भाजपा जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, कोलगाव सरपंच संतोष राऊळ, उपसरपंच दिनेश सारंग, माजी सरपंच संदीप हळदणकर, बळवंत कुडतरकर,सोसायटी चेअरमन चंदन धुरी आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मंत्री राणे म्हणाले, भारतीय जनता पार्टीचे सदस्यता नोंदणी अभियान प्रत्येक गावागावात व प्रभागात मिशन म्हणून राबविणे आवश्यक आहे. जेणेकरून पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देश आणि राज्याच्या हिताचे जे जे निर्णय घेतले जात आहेत ते निर्णय पक्षाचा सदस्य म्हणून त्यांच्यापर्यंत थेटपणे पोहोचविता येतील. त्यामुळेच सर्वाधिक सदस्य नोंदणीच्या दृष्टिकोनातून काम करा असे आवाहन त्यांनी केले. महाअभियानात सदस्य नोंदणी केलेल्या कार्यकर्ते व मतदार यांना नितेश राणे यांच्या हस्ते नोंदणी कार्ड प्रदान करण्यात आले. रविवारी सकाळच्या पहिल्या सत्रात कोलगाव येथील आयोजित भाजपच्या सदस्य नोंदणी अभियानात दोनशे हून अधिक सदस्यांनी पक्षाची नोंदणी केली. यावेळी दीपक डांबरेकर, बाबू करमळकर, राजन करमळकर, सदस्य राजा चव्हाण, बलवंत कुडतरकर, बाळा राऊळ, अनिल नाईक, भई नाईक, विशाल पालव, भावेश राऊळ, नवल गावडे, महादेव राऊळ, आदी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, नितेश राणे यांनी कोलगाव ग्रामपंचायतला भेट देत सरपंच, उपसरपंच व सदस्य यांच्याशी विकास कामांसंदर्भात चर्चा केली. या प्रसंगी सरपंच संतोष राऊळ यांनी कोलगाव गावचे ग्रामदैवत श्री देव सातेरी व श्री देव कलेश्वर मंदिराच्या सुशोभिकीकरणासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली. यावर तातडीने प्रस्ताव सादर करा निधी मंजूर करू असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच कोलगाव ग्रामसचिवालयाच्या इमारतीसाठीही तातडीने प्रस्ताव सादर करा आपण त्यासाठी लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले .

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles