Wednesday, October 29, 2025

Buy now

spot_img

‘रेझिंग डे’ निमित्ताने उद्या पोलीस दलातर्फे सावंतवाडी येथे प्रदर्शन.! ; नागरिक व विद्यार्थ्यांना लाभ घेण्याचे पी. आय. अमोल चव्हाण यांचे आवाहन.

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक यांचे संकल्पनेतून उद्या दि. 08/01/2025 रोजी सकाळी 10:00 वा. ते सायं 07:00 वा. या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या वतीने ‘रेझिंग डे’ सप्ताहाच्या अनुषंगाने पोलीस दलाची व पोलिसांच्या कामकाजाची नागरिकांना माहिती होण्याकरिता सावंतवाडी येथील जगन्नाथ भोसले उद्यान येथे प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे.
उपरोक्त प्रदर्शनामध्ये श्वानपथक, बॉम्ब शोधक व नाशक पथक, सायबर गुन्हे सुरक्षा, अग्निशस्त्रे, फॉरेन्सिक युनिट, महिला सहाय्य, वाहतूक नियमन व नियंत्रण, पोलीस दलाची रचना व कार्यपद्धती याबाबत माहिती देण्यात येणार आहे.
तरी सदर प्रदर्शनास जास्तीत जास्त नागरिक व विद्यार्थी यांनी भेट देऊन प्रदर्शनातून माहिती घेण्याचे आवाहन सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. अमोल चव्हाण यांनी केलेले आहे.

ADVT –

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles