सावंतवाडी : तालुक्यातील आरोस दांडेली येथील माजी सरपंच कृष्णा पालयेकर यांच्या घराच्या अंगणात चक्क बिबट्याने हजेरी लावली.ही घटना आज सायंकाळ साडेसात वाजता घडली.हा प्रकार सीसीटीव्ही कैद झाला आहे.त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.दरम्यान भरवस्तीत येणाऱ्या वन्य प्राण्यांना रोखण्यासाठी वनविभागाने योग्य ती खबरदारी घ्यावी,अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.
ADVT –





