Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

सिंधुदुर्गातील विविध उपजिल्हा रुग्णालयांमध्ये मोफत आरोग्य तपासणी व ऑपरेशन शिबीराचे आयोजन.

सिंधदुर्ग : अथायु हॉस्पिटल कोल्हापूर व सिंधुदुर्ग विविध उपजिल्हा रुग्णालय यांच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी व ऑपरेशन शिबीर दिनांक १३ जानेवारी ते १५ जानेवारी अनुक्रमे कणकवली, सावंतवाडी, शिरोडा ह्या उपजिल्हा रुग्णालयांध्ये सकाळी ११ ते २ ह्या वेळेत आयोजित केले आहे.  ह्या शिबीरांमध्ये मोफत हृदयविकार, अँजिओग्राफ़ी, पित्ताशात खडे, मुतखडा, प्रोस्टेट, कॅन्सर, केमोथेरपी, व्हेरिकोज व्हेन्स, मणका तपासणी होणार आहे महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना अंतर्गत अँजिओप्लास्टी, बायपास, हृदयाचे व्हॉल्व बदलणे, दुर्बिणीद्वारे मुतखडा , प्रोस्टेट,दुर्बिणीद्वारे पित्ताशाचे खडे, हाडाचे फ्रॅक्चर, सर्व प्रकारचे कॅन्सर, डायलेसीस, लेसर द्वारे व्हेरिकोज व्हेन्स, हे उपचार सर्व रेशन कार्ड व आधार कार्ड धारकांना मोफत ऑपरेशन करण्यात येणार आहेत.

तसेच शिबीर दिवशी ई.सी.जी, रक्तातील साखर तपासणी, रक्तदाब तपासणी मोफत करण्यात येणार असून नाव नोंदणीसाठी ८९२८७३६९९९ ह्या नंबर संपर्क करावा तरी जास्तीत जास्त सिंधदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक मार्फ़त करण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे शस्त्रक्रिया करण्यापूर्वी आपले रेशनिंग कार्ड व सर्व कुटुंबातील आधार कार्ड पासपोर्ट साईज फोटो सर्वांचे त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीचे मोबाईल नंबर प्रत्येकाचे कुटुंबातील व्यक्तीचे महिलांचे आईचे नाव हे उपजिल्हा किंवा जिल्हा रुग्णालय शासकीय रुग्णालय महात्मा फुले कक्षा वरती जाऊन किंवा ई सेवा केंद्र मध्ये जाऊन तपासणी करून घेण्यात यावे.

त्याचप्रमाणे सफेद रेशनिंग कार्ड असल्यास त्यांनी तालुक्याच्या तहसीलदार ऑफिसमध्ये पुरवठा शाखेमध्ये जाऊन आपला बारा अंकी नंबर रेशनिंग कार्ड वरती घालून घेण्यात यावा त्यानंतर वरील ई-सेवा केंद्र किंवा शासकीय रुग्णालय महात्मा फुले कक्ष या वर जाऊन तपासणी करून घेणे आवश्यक आहे व त्यानंतर एक सर्टिफिकेट मिळणार रेशनिंग कार्ड तपासल्याचे मिळणार आहे.

त्यानंतर तुम्हाला नवीन नियमाप्रमाणे हे सर्व कागदपत्रे पूर्ण झाल्यानंतर शस्त्रक्रिया महात्मा फुले जीवनदायी जन आरोग्य योजना अंतर्गत मोफत मिळणार आहे तसे रेशन कार्ड वरील कागदपत्रे न तपासल्यास तुम्हाला शस्त्रक्रियेचा मोफत लाभ योजनेअंतर्गत मिळणार नाही यामुळे शिबिरा येण्यापूर्वी आपण वरील कागदपत्रे पूर्ण तपासून व आपल्याला असलेला आजार व त्याचे रिपोर्ट सर्व घेऊन येणे आवश्यक आहे.

सर्व व्यक्तींनी व रुग्णांनी रुग्णांच्या नातेवाईकांनी आपले रेशनिंग कार्ड तपासून घेण्यात यावे त्याचप्रमाणे तुमचे आवश्यक असलेले तपासणी रिपोर्ट चा खर्च रुग्णांनी करायचा आहे तसेच ऍन्जिओग्राफी केल्यानंतर लगेचच आमच्या रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया करून घ्यायचे आहे तसे न केल्यास व पाठवून शस्त्रक्रिया करण्याचे ठरवल्यास त्याचा एन्जिओग्राफीचा खर्च आपल्याला द्यावा लागणार आहे. अशी माहिती सुद्धा अथायु मल्टी स्पेशालिस्ट कोल्हापूर या रुग्णालयाने दिली आहे. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्हा सावंतवाडी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांना सावंतवाडी मध्ये येणारे रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी आगाऊ फोन नंबर करून शिबिरात तपासण्यासाठी आगाऊ बुकिंग करणार यावे.

राजू मसुरकर यांचा नंबर 9422435760 बुकिंग करण्यासाठी सकाळी 11:30 ते दुपारी एक वाजेपर्यंत सायंकाळी साडेचार ते सात वाजेपर्यंत मसुरकर यांच्या मोबाईलवरती फोन करून आपले तपासणीसाठी बुकिंग करून येण्यात यावे.

कोल्हापूर अथर्व मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल,

विमानतळ शेजारी,

गोकुळ शिरगाव रोड नजीक.

रुग्णालयाचा लँडलाईन नंबर-
+91 2313502333

ADVT – 

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles