सावंतवाडी : आंबोली रोड कॉर्नरला मेन लाईन असलेल्या पोलावर एक मोठा लोखंडी रॉड तुटून लटकत आहे. सदर ठिकाणी कुडाळ व आंबोली येथे जाणाऱ्या वाहनांची व नागरिकांची गर्दी असते. अशावेळी सदर रॉड तुटून पडल्यास दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्या अगोदर वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांनी त्यावर तात्काळ कारवाई करून तो लटकता रॉड तत्काळ हटवावा, अशी मागणी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी केली आहे.
ADVT –




