सावंतवाडी : डॉ .होमी भाभा यंग सायंटिस्ट परीक्षा 30/11/24 रोजी आरपीडी हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडी येथे घेण्यात आली. या परीक्षेला 11 विद्यार्थी सहभागी झाले होते.
कु. चिदानंद चंद्रशेखर रेडकर (इयत्ता 6वी) याला लेखी परीक्षेमध्ये 68 गुण मिळाले. आणि 5/1/25 रोजी कोल्हापुरात घेण्यात आलेल्या द्वितीय स्तर- परीक्षेसाठी तो पात्र ठरला.
प्राचार्य रेव्ह.फा.रिचर्ड सालदान्हा यांनी कु. चिदानंद यांचे अभिनंदन केले व प्रमाणपत्र देऊन सत्कार केला.यावेळी पर्यवेक्षक टीचर.संध्या मुणगेकर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


