सावंतवाडी : स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील इयत्ता सहावी मधील ‘ कु. सोहम सचिन देशमुख ‘ याने राष्ट्रीय पातळीवर बुद्धिबळ स्पर्धेत उंच यशाचे शिखर गाठले. ही स्पर्धा ‘ ऑल इंडिया ओपन फिडे रेटिंग क्लासिकल चेस ट्युरनामेंट ‘ यांच्यातर्फे ‘ लायन्स क्लब ऑफ बेळगाव मधील संघटना व बीडीसीए या संघटनेच्या संयुक्त विद्यमानाने विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. दिनांक ४ जानेवारी २०२५ ते ८ जानेवारी २०२५ हा या स्पर्धेचा कालावधी होता. या स्पर्धेत मलेशिया व भारतातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. संपूर्ण भारतातील विद्यार्थ्यांमध्ये १३ वयोगटाखाली असलेल्या या स्पर्धेत प्रशालेतील कु. सोहम सचिन देशमुख या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकावत बुद्धीची चुणूक दाखवून दिली. त्याला सन्मानचिन्ह म्हणून चषक देऊन गौरविण्यात आले. या विद्यार्थ्याला त्याच्या पालकांचा व प्रशालेतील शिक्षकांचा पाठिंबा लाभला. प्रशालेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर व संस्थापक श्री. रुजुल पाटणकर यांनी त्याचे भरभरून कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या सोहम देशमुखचे राष्ट्रीय पातळीवरील बुद्धिबळ स्पर्धेत यश.!
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]