Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

सावंतवाडी येथील ‘महाआरोग्य’ शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.!

सावंतवाडी : अथायु मल्टिस्पेशालिस्ट हाॅस्पिटल, कोल्हापूर व उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने सावंतवाडी येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते यांचा शुभारंभ करण्यात आला. या शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला.

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय व अथायु मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज उपजिल्हा रुग्णालय येथे महाआरोग्य शिबिर भरवण्यात आले होते.युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते यांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महात्मा फुले जीवनदायी जन आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णांनी तपासणी करून या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.यावेळी जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान चे अध्यक्ष राजू मसुरकर, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. गिरीश चौगुले, जनरल सर्जन स्त्रीरोगतज्ञ डॉ.ज्ञानेश्वर ऐवळे, अथायु मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलचे डॉ. सुदेश मुळीक ,डॉ. रघुनाथ नाईक मार्केटिंगचे हेड मदन गोरे, विवेक चव्हाण ,वैभव काटकर अथायु हॉस्पिटलचे पी आर ओ किरण पाटील, रोहित कुरणे, गौरव आपटे हॉस्पिटलचे सारथी संदीप पाटील आदी आरोग्य कर्मचारी तसेच सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते रवी जाधव, रूपा मुद्राळे, ओमकार पडते ,संजय तानावडे तसेच उपजिल्हा रुग्णालयाचे आरोग्य कर्मचारी परिचारिका रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक या महाआरोग्य शिबिराला उपस्थित होते.

यावेळी युवराज लखमराजे भोसले यांनी अथायु मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल कोल्हापूर या रुग्णालयाने अनेक रुग्ण शस्त्रक्रिया करून चांगल्या प्रकारे सेवा दिली आहे. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये चांगली आरोग्यसेवा रुग्णांना मिळत आहे. राजघराण्याकडून गोरगरिबांना नेहमी सहकार्य राहिले आहे असे उद्गार सावंतवाडी संस्थांचे युवराज लखमराजे सावंत भोसले यांनी काढले.

तसेच उपजिल्हा रुग्णालय अधिक्षक डॉ. गिरीश चौगुले, जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी मनोगत व्यक्त केली. गोरगरीब रुग्णांना शासनाच्या योजनेच्या माध्यमातून उपचार आणि शस्त्रक्रिया मोफत होत आहेत. जिल्ह्यात हा उपक्रम उप जिल्हा रुग्णालय व अथायुच्या सहकार्यान होत असून तो रूग्णांच्या हिचाचा आहे असे उद्गार श्री.मसुरकर यांनी काढले.अथायु रुग्णालयाचे मार्केटिंग मॅनेजर मदन गोरे यांनी आभार मानले. बहुसंख्य रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी या महाआरोग्य शिबिराचा लाभ घेतला.

ADVT –

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles