Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

हिच तर खरी पुण्याई! ; माझ्यावर माणूस म्हणून जगण्याचे संस्कार केलेल्या शाळेला स्वच्छ, सुंदर बनवण्याचे भाग्य लाभले! : रवी जाधव.

चला, आपली प्राथमिक मराठी शाळा वाचवण्यासाठी प्रयत्न करूया!

सावंतवाडी : ‘शाळा’ हा शब्द उच्चारला की बालपणीचे सर्व दिवस आठवतात. रस्त्यावरून येता-जाता नेहमी शाळेचे दर्शन होतं आणि जणू काही ती शाळा मला हाक देऊन काहीतरी सांगत आहे, असा भास होत होता.
त्यावेळी पेन्सिल घ्यायला पैसेही नव्हते ती शाळेने दिली. पाटी घ्यायला पैसे नव्हते, ती शाळेने दिली. आज जो काही मी आहे तीही ओळख माझ्या या शाळेने मला दिली आणि अशी माझी शाळा जेव्हा मला उदास वाटली तेव्हा त्याच्या जवळ जाऊन त्याच्या भावना समजून घेऊन आज ती शाळा पुन्हा स्वच्छ-सुंदर व बोलकी बनवण्याचे भाग्य मला लाभले, असे प्रतिपादन सामाजिक बांधीलकीचे रवी जाधव यांनी केले.

रवी जाधव पुढे म्हणाले, कोळंबेकर कुटुंबातील सदस्यांनी सदर शाळा बांधण्यासाठी जागा बक्षीस पत्राने दान केली होती म्हणून या शाळेचे नाव कै.श्रीम. लक्ष्मीबाई मुरारी माधव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर ६ भटवाडी सावंतवाडी असे पडले आहे तर या शाळेच्या उभारणीसाठी भटवाडीतील ग्रामस्थांचे मोठे सहकार्य लाभले आहे.
आमची ही शाळा पुन्हा एकदा स्वच्छ व सुंदर बनवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण कदम तसेच आमचे सहकारी मित्र समीरा खलील, संजय पेडणेकर, अशोक पेडणेकर, शामसुंदर हळदणकर ,रूपा मुद्राळे, सुजय सावंत व शेखर सुभेदार यांचेही सहकार्य लाभले.
शाळेचे मुख्याध्यापक केशव जाधव, शिक्षिका लांबर मॅडम तसेच या शाळेचे विश्वस्त मा. दिलीप भालेकर व मा. नगरसेविका सौ.दिपाली भालेकर यांनी आमच्या या कार्याचे कौतुक केले आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles