Wednesday, October 29, 2025

Buy now

spot_img

सावंतवाडीतील मॅरेथॉन स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद.! ; सिंधुदुर्ग सैनिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आंबोली व सावंतवाडी नगरपरिषद यांचचे संयुक्त आयोजन.

सावंतवाडी : सिंधुदुर्ग सैनिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, आंबोली आणि सावंतवाडी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मॅरेथॉन स्पर्धा उदंड प्रतिसादात संपन्न झाली. कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, सातारा, गडहिंग्लज, चंदगड, सिंधुदुर्ग येथील विविध भागातील तब्बल ८५० स्पर्धक सहभागी झाले होते.
मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, सैनिक स्कूल कार्यकारी अध्यक्ष श्री. सुनील राऊळ, डाॅ. मिलींद खानोलकर, आय ई एस एल सिंधुदुर्ग अध्यक्ष शशिकांत गावडे, उपाध्यक्ष कॅप्टन दिनानाथ सावंत, सैनिक पतसंस्था चेअरमन बाबुराव कविटकर, संचालक जाॅय डांटस, कार्यालयीन सचिव दिपक राऊळ, शैलेश नाईक, माजी प्राचार्य सुरेश गावडे, प्रल्हाद तावडे, प्राचार्य श्री. नितीन गावडे, ह्रषिकेश गावडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

स्पर्धेची सुरवात जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यान येथून करण्यात आली. प्रारंभी राष्ट्रगीत गायन करण्यात आले. सैनिक स्कूल कॅडेट अथर्व पालव यांने मॅरेथॉन संबंधी भाषण केले. श्री.ह्रषिकेश गावडे यांनी पर्यावरण संवर्धनाची प्रतिज्ञा उपस्थितांना दिली.श्री. मनोज देसाई व श्री शैलेश नाईक यांनी स्पर्धेचे नियम समजावून सांगितले.मान्यवरांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
पोलीस निरीक्षक श्री.अमोल चव्हाण यांनी पुरुष खुला गटास हिरवा ध्वज दाखवून स्पर्धेस प्रारंभ झाला.यानंतर १७,१४,१० वर्षे वयोगटातील मुले व मुली अशा विविध सात गटांत स्पर्धा घेण्यात आली.
या भव्य मॅरेथॉन स्पर्धेत खालील प्रमाणे स्पर्धक विजेते ठरले.
१० वर्षाखालील वयोगट-
प्रथम- जय पांडुरंग मोहनगेकर
द्वितीय- सिद्धि प्रदीप चव्हाण
तृतीय-यज्ञेश योगेश दळवी.
१४ वर्षाखालील वयोगट मुली –
प्रथम- जान्हवी पांडुरंग मोहनगेकर
द्वितीय -दिविजा संदिप सातपुते
तृतीय- सौम्या दत्तात्रय मेस्त्री.
१४ वर्षाखालील वयोगट मुले –
प्रथम- शिवम अमरजित यादव
द्वितीय – लंबोदर सचिन पोवार
तृतीय- अभी विजय वानकडे.
१७ वर्षाखालील वयोगट मुली –
प्रथम- प्रियांका प्रकाश कुपटे
द्वितीय – मेघा प्रमोद सातपुते
तृतीय- समिक्षा जानु वरक.
१७ वर्षाखालील वयोगट मुले –
प्रथम- राहुल सुरेश लवटे
द्वितीय – शुभम हिंदुराव किरुळकर
तृतीय- मोहन वैजू पाटील.
खुला गट महिला —-
प्रथम- प्रज्ञा दत्तात्रय गोरुले.
द्वितीय – रेश्मा रावबा पांढरे
तृतीय- वैष्णवी आत्माराम सावंत.
खुला गट पुरुष-
प्रथम- सिद्धेश पांडुरंग बर्जे
द्वितीय – ॠतिक रामकुमार वर्मा
तृतीय- धनाजी रामू गुरखे
विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कमेची पारितोषिक, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.बक्षिस वितरण पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, कॅथलिक पतपेढी चेअरमन आनमारी डिसोजा,,कर्नल विजयकुमार सावंत, कार्यकारीअध्यक्ष सुनील राऊळ,संचालक जाॅय डांटस, कार्यालयीन सचिव दिपक राऊळ ,प्राचार्य नितीन गावडे यांच्या हस्ते करण्यात आले.
श्री.ह्रषिकेश गावडे यांनी सूत्रसंचालन केले व सर्वांचे आभार मानले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles