Wednesday, October 29, 2025

Buy now

spot_img

सिंधुदुर्ग प्रेस क्लबचा ‘सोशल मीडिया आदर्श पत्रकार’ पुरस्कार आनंद धोंड यांना महाराष्ट्र राज्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान!

सावंतवाडी : येथील कोकण दर्शन न्यूज चॅनेलचे संपादक आनंद धोंड यांना सावंतवाडी प्रेस क्लबच्या वतीने यावर्षीचा ‘सोशल मीडिया आदर्श पत्रकार पुरस्कार’ महाराष्ट्र राज्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर व माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमांत श्री. धोंड यांना शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, सिंधुदुर्ग प्रेस क्लबचे संस्थापक अध्यक्ष सीताराम गावडे, अध्यक्ष अनंत जाधव,  प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार श्रीधर पाटील, नगरपालिकेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे, शिवसेना जिल्हा प्रमुख अशोक दळवी, तालुका प्रमुख बबन राणे, युवा शेतकरी दिनेश गावडे, माजी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, जिल्हा बँकेचे संचालक रवींद्र मडगावकर,आनंद नेवगी, दिलीप पाटील भालेकर, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे, पत्रकार रमेश बोंद्रे, अभिमन्यू लोंढे, शिवप्रसाद देसाई, संजय भाईप, सचिन रेडकर, अमोल टेंबकर, विजय देसाई, राजू तावडे, दिव्या वायंगणकर, हेमंतोलकर, संदेश पाटील, राकेश परब, जय भोसले, मिलिंद धुरी, आनंद कांडर, शैलेश मयेकर, अनुजा कुडतरकर, निखिल माळकर, शुभम धुरी, महादेव भिसे य विविध विविध मान्यवर उपस्थित होते.
पत्रकार आनंद धोंड यांनी डिजिटल मीडियाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हामध्ये कमी वर्षांमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपले नाव समाजामध्ये लौकिक केले.याच कार्याची दखल घेत पत्रकार आनंद धोंड यांना सावंतवाडी प्रेस क्लबच्या सोशल मीडियाच्या वतीने यावर्षीचा आदर्श पत्रकार पुरस्कार महाराष्ट्र राज्य विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

प्रेस क्लबचे संस्थापक अध्यक्ष सिताराम गावडे यांनी देखील यावेळी शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक प्रेस क्लबचे अध्यक्ष अनंत जाधव यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा. रुपेश पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन राकेश परब यांनी केले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles