सावंतवाडी : येथील श्री. पंचम खेमराज लॉ कॉलेज येथे शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ पासून एल. एल. एम कोर्स चालू करण्यासाठी महाराष्ट्र शासन, मुंबई विद्यापीठ, कडून परवानगी देण्यात आलेली आहे. सदर अभ्यासक्रमासाठी 60 विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असून ‘Constitutional and Administrative Law’ आणि ‘Criminal Law and Criminal Administration’ हे ग्रुप शिकायला मिळणार आहेत हा 2 वर्षाचा कोर्स आहे व एकूण 4 सेमिस्टर असणार आहेत.
2013 पासून आमच्या महाविद्यालयात L. L.B तीन वर्षीय अभ्यासक्रमाचा विद्यार्थी लाभ घेत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बऱ्याच विद्यार्थ्यांना विधीशाखेत पदव्युत्तर शिक्षण घेण्याची संधी आज उपलब्ध झाली आहे. त्यामुळे भविष्यात, उद्योग क्षेत्र, आर्थिक क्षेत्र, व्यवसायिक क्षेत्र, मीडिया, रिअल estate, railway, defence, विमा क्षेत्र, बैंकिंग क्षेत्र तसेच कॉर्पोरेट क्षेत्रात विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध आहेत. तसेच शिक्षण क्षेत्रात law professor म्हणून व PhD करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळू शकते. त्यामुळे LLM च्या संधीचा विद्यार्थ्यांनी आणि वकिलांनीही फायदा करून घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत खेमसावंत भोंसले, संस्थेच्या कार्याध्यक्षा श्रीमंत सौ. शुभदादेवी भोंसले, विश्वस्त लखमसावंत भोंसले, सौ. श्रद्धाराजे भोंसले, तसेच नियामक मंडळाचे सदस्य डॉ. सतीश सावंत, श्री. जयप्रकाश सावंत व संचालक श्री. डी. टी देसाई, सह संचालक अॅड. शामराव सावंत व कॉलेजच्या प्राचार्या डॉ. अश्विनी लेले यांनी केले.


