सावंतवाडी : तब्ब्ल २९ वर्षानंतर कळसुलकर जुनिअर कॉलेजमधील १९९६ मधील बारावी वर्गातील विद्यार्थी एकत्र येऊन कॉलेज मधील जुन्या आठवणीना उजाळा देत आपल्या मैत्रितील ऋणानुबंध कसे असावेत आणि त्याचा उपयोग कुठे करावा? याचा आदर्श या १९९६ मधील बॅचने मागच्या वर्गना घालून दिला आहे.
खरं बघायला गेलं तर दहावी, बारावी, पदवी परीक्षा संपल्यावर प्रत्येक जण आपली परिस्थिती आणि बुद्धी कौशल्य याच्या साथीने नोकरीं धंद्यासाठी बाहेर गावी जातात. मात्र अशा परिस्थितीत आपले विद्यार्थी जीवनातील मित्र मत्रिणी कुठे असतील आपल्या गाठी भेटी परत होतील का?, असा प्रश्न निर्माण होतो. अशाच वेळी या बॅचमधील दोन विद्यार्थी भेटले आणि त्यांनी आपल्या बारावी बॅचमधील सर्व मित्र – मैत्रीणीचे पत्ते शोधून काडून व्हाट्सअप ग्रुप तयार करून सावंतवाडी राजवाडा येथे एकत्र जमून स्नेहभोजन केले.

या कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यानी जुन्या आठवणीना उजाळा देत आपापली मनोगत व्यक्त केली. तब्बल एकोणतीस वर्षानंतर जुन्या मित्र मैत्रिणीची भेट झाल्याने सगळ्यांचा चेहरा फुलला होता. शेवटी सध्या कोण कुठे राहतो?, काय करतो?, कोणत्या पदावर काम करतो?, या सर्व चर्चा गप्पामध्ये रंगल्या. यात त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत आनंद साजरा केला. या आंनदात कोण कोण मित्र परिवार नाही आणि कुठे आहेत? याची चौकशी झाली. यात नेमळेतील आपला वर्गमित्र जयप्रकाश गावडे याची दोन वेळा बायपास सर्जरी झाली. यातच त्याला अर्धांगवायूचा झटका आला आणि आज त्याच्या सातवीतील मुलाचं पोटाचं ऑपरेशन आहे. हे ऐकताच सर्व मित्र – मैत्रिणी एकदम शांत झाल्या. आपण एन्जॉय करतो आणि आपल्या बॅचच्या मित्राची अशी अवस्था आहे. आपण सर्वांनी त्याच्या घरी जाऊन त्याच्या आरोग्यविषयीं जाणून घेऊया आणि थोडीशी आर्थिक मदत करूया. आपण वेळप्रसंगी एकमेकांच्या उपयोगी नाही पडलो तर आपला उपयोग काय? असे ठरवून काल रविवार दि जा.१९ जानेवारी दिवशी नेमळे फौजदारवाडी येथील जयप्रकाश गावडे याच्या घरी १९९६ चे मित्र परिवार येऊन गावडे यांची विचारपूस केली.
“तुला आजारपण आलं म्हणून घाबरू नकोस!, आम्हाला कधीही फोन कर तुझ्या घरच्यासारखे आम्हीही तुझ्यासोबत आहोत.!” तसेच थोडीशी आर्थिक मदत दिली. स्नेह मेळाव्याचे प्रतीक म्हणून ही भेट एक अविस्मरणीय क्षण ठरला. यावेळी श्री महेश हवालदार, कृष्णा राऊळ, समीर हडकर, जितेंद्र म्हापसेकर, हेमंत परब, राजेश राणे, रवींद्र धुमक,राजेश देसाई,पबी पारधी, शितल पावसकर,दर्शना सावंत, माया चव्हाण, सुवर्णा शिरसाठ, राजश्री सावंत, राखी सावंत मुक्ता सावंत, तृप्ती हरिदास (देशपांडे ),मीनल कसाबले (परब ) तसेच बारावी १९९६ बॅचचे इतर मित्र उपस्थित होते.


