Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

फ्लोरेट कॉलेज ऑफ डिझायनिंगच्या ‘आरंभ’ प्रदर्शनचे २५ रोजी कणकवलीत उद्घघाटन!, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांची उपस्थिती. ; ‘फ्लोरेट’च्या संचालिका सार्था कदम यांची माहिती.

कणकवली : कणकवली शहरातील फ्लोरेट कॉलेज ऑफ डिझायनिंगच्या आरंभ प्रदर्शनचे २५ ते २६ जानेवारी या कालावधीत फ्लोरेट कॉलेज ऑफ डिझायनिंगच्या सभागृहात (कणकवली पोस्ट ऑफिसच्या वरती) आयोजित करण्यात आले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात असे प्रदर्शन प्रथमच भरविण्यात येत असून त्याचे उद्घघाटन २५ रोजी स. ११ वा.माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, यांची उपस्थितीत आयोजित करण्यात आले असल्याची माहिती फ्लोरेट कॉलेज ऑफ डिझायनिंगच्या संचालिका सार्था किशोर कदम यांनी दिली.

सार्था कदम यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की फ्लोरेट कॉलेज ऑफ डिझायनिंगच्या माध्यमातून सिंधुदुर्गमध्ये पहिलेच इंटीरियर आणि फॅशन डिझाईन प्रदर्शन प्रथमच भरत आहे. हे प्रदर्शन म्हणजे इंटीरियर आणि फॅशन डिझाईन यांचा अनोखा संगम आहे.तसेच फॅशन डिझाईन मधील ही सुविजनतेची अनोखी दुनिया आहे.इंटीरियर डिझाईन विद्यार्थीनी तयार केलेले युनिक सेटअप्स, नाविन्यपूर्ण फर्निचर, आणि स्व-डिझाइन केलेली यंत्रणा या प्रदर्शनात पहावयास मिळणार आहे.थीम बेस्ड ड्रेसेस आणि हँडमेड ज्वेलरी डिझाईन केली आहे, जिथे पारंपरिक आणि आधुनिक स्टाईलचा सुंदर मिलाफ दिसेल. कणकवली फ्लोरेट कॉलेज ऑफ डिझायनिंग, पहिला मजला, कणकवली कॉलेज रोड, नवीन पोस्ट ऑफिसवरती २५ ते २६ जानेवारी या दोन दिवशी स. १० ते सायं. ७ या वेळात हे प्रदर्शन पाहता येणार असल्याची माहितीही सार्था कदम यांनी दिली.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles