सावंतवाडी : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 99 वा जयंती उत्सव उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या सावंतवाडी तालुका मध्यवर्ती कार्यालयात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख रुपेश राऊळ यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाला.
“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो.!”, “परत या परत या, बाळासाहेब परत या.!”, “जय शिवाजी, जय भवानी!”, “छत्रपती शिवाजी महाराज की जय.!” अशा जोरदार घोषणा यावेळी शिवसैनिक यांनी दिल्या.
सुरुवातीला सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला त्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार यांच्या हस्ते शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या. या जयंती उत्सवासाठी तालुकाप्रमुख मायकेल डिसोजा, महिला तालुका संघटक भारती कासार, जिल्हा संघटक शब्बीर मणियार, शहर संघटक श्रुतिका दळवी, फिलिप्स रॉड्रिग्ज, दिव्या पवार, संगीता पेडणेकर, कल्पना शिंदे, राजा वाडकर, हरेश नार्वेकर, निशिकांत तोरस्कर, अब्दुल रहिमान, राजू शेटकर, राजू काळे, नामदेव नाईक, गुरुनाथ नाईक, मंथन गवस, उत्तम पारधी, हेलन निबरे, सुनीता राऊळ आदी उपस्थित होते.

सडेतोड बोलणारे बाळासाहेब आज आपल्यामध्ये नाहीत मात्र त्यांच्या विचारांवर चालणारी शिवसेना मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. 80 टक्के समाजकारण आणि 20% राजकारणाची शिकवण त्यांनी दिली त्यांचा वारसा आणि वसा पुढे असाच शिवसैनिकांनी अविरत चालू ठेवावा. शिवसैनिकांनी पेटून उठून काम करा, असे आवाहन सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख रुपेश राऊळ यांनी केले.

त्यानंतर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या 99 व्या जयंती उत्सवानिमित्त कुडाळ तालुक्यातील झाराप येथील मतिमंद मुलांच्या आश्रमामध्ये धान्य व खाऊचे वाटप करण्यात आले.


