सावंतवाडी : हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 99 वी जयंती माजी शालेय शिक्षण मंत्री व आमदार दीपक केसरकर यांच्या संपर्क कार्यालयात जिल्हाप्रमुख अशोक दळवी आणि तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे यांच्या उपस्थितीमध्ये साजरी झाली.
सावंतवाडी येथील माजी शालेय शिक्षण मंत्री आणि विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्या श्रीधर अपार्टमेंट संपर्क कार्यालयात हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सुरुवातीला जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे यांच्या हस्ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
“छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “जय शिवाजी जय भवानी!” अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. जयंतीनिमित्ताने भारतीय जनता पार्टीचे विनोद सावंत, हेमंत बांदेकर, यांच्यासह महिला तालुका संघटक भारती मोरे, शहर प्रमुख बाबू कुडतरकर, माजी नगरसेविका शर्वरी धारगळकर, सरपंच प्राची कुबल, नागेश गावडे, विश्वास घाग, दत्ता सावंत, शैलेश मेस्त्री, ललिता सिंग, गुंडू जाधव, गजानन नाटेकर, कॅप्टन शशिकांत गावडे, महादेव राऊळ, वैशाली कानसे, शिल्पा मेस्त्री, प्रसन्न शिरोडकर यांसह शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


