Wednesday, October 29, 2025

Buy now

spot_img

सावंतवाडीत रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.! ; केमिस्ट अँण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे आयोजन.

सावंतवाडी :केमिस्ट हृदय सम्राट आप्पासाहेब शिंदे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट असोसिएशन आणि सावंतवाडी तालुका केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनच्यावतीने शुक्रवारी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात

आयोजीत कऱण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात ४० रक्त दात्यांनी रक्तदान केले तर यानिमित्त १०० जणांनी रक्तदानाचा संकल्प केला.
यावेळी प्रसुती व स्त्रिरोग तज्ञ डॉ राजेश नवांगुळ, युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी आदींनी भेट देत रक्तदान शिबिराचा उपक्रम आयोजित केल्याबद्दल केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनचे कौतुक केले. यावेळी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ गिरीश चौगुले उपस्थित होते. या शिबिरात सावंतवाडी रक्त पेढीचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ निखिल अवधूत, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी प्रशांत सातार्डेकर, प्राजक्ता रेडकर, परिचारिका मानसी बागेवाडी, डॉ बुवा, परिचर अनिल खाडे यांनी रक्त संकलन केले.
यावेळी रक्तदान सारख्या पवित्र कार्यात योगदान दिल्याबद्दल सावंतवाडी रक्तपेढीच्यावतीने केमिस्ट्री ड्रगिस्ट असोसिएशनचा प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी सिंधुदूर्ग डिस्ट्रिक्ट केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आनंद रासम, सावंतवाडी तालुका केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विनायक दळवी, सचिव संतोष राणे,माजी अध्यक्ष मकरंद कशाळीकर, श्रीराम गावडे, अमर गावडे, सचिन मुळीक, स्टिव्हन डिसिल्वा, कालिदास बर्वे, सौ पल्लवी बर्वे, सौ नवांगुळ, ग्रेगरी डांटस, श्रीकृष्ण सप्ते, गजानन धुरी, सुहास गावडे, प्रशांत पेडणेकर, सतिश पडते,, पराग सावंत, बाबुराव मुळीक, शैलेष राजोबा, अभिजित घाडी, श्रीकांत आरावंदेकर संयोगिता कालकुंद्रीकर, उमेश काळकुंद्रीकर, वैभव गावडे, साईश राणे, कुडाळचे गुरूनाथ देसाई, दिनेश निवतकर, रवी बांदेलकर आदी उपस्थित होते.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles