. राष्ट्रध्वज फडकवून पालकमंत्री नितेश राणे यांनी राष्ट्रध्वजाला दिली मानवंदना!
. प्रजासत्ताक दिनाच्या सिंधुदुर्ग वासियांना पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या शुभेच्छा.!
संतोष राऊळ (ओरोस)
सिंदुदुर्गनगरी : आज पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त सिंधुदुर्ग नगरी मुख्यालय येथे राष्ट्रध्वज फडकवून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. व प्रजासत्ताक दिनाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.आपला पालकमंत्री म्हणून मी आपली प्रामाणिक सेवा करणार आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी मी पालकमंत्री म्हणून सदैव तत्पर आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. अशी ग्वाही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला आज प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.
सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे राष्ट्रध्वज फडकवल्या नंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी जनतेला संबोधित केले. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील,आमदार निलेश राणे, एस.पी. सौरभ कुमार अग्रवाल, सी
ओ.मकरंद देशमुख यांच्यासह जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आधी सह प्रमुख नेते पदाधिकारी अधिकारी यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्री नितेश राणे म्हणाले,राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित जी पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकारने राज्याच्या सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी अनेक जनहिताचे निर्णय घेतलेले आहेत. या निर्णयाचा सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, युवा,महिला असे सर्वच घटक लाभ घेत आहेत. भारत हे प्रजासत्ता राष्ट्र असून जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र म्हणून आपल्या देशाच्या नावलौकिक आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातली हे सरकार स्थापन झाले आहे. सामान्य नागरिकांचा दैनंदिन जीवन सुखकर व्हावे.यासाठी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृती कार्यक्रम निश्चित करून दिला आहे. या कार्यक्रमाची प्रशासन येत्या शंभर दिवसात प्राधान्याने कारवाईची करून पूर्तता करेल. योग्य पद्धतीने अंमलबजावणी होईल.असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वखाली दाओस येथे केलेल्या करारामुळे विविध उद्योग क्षेत्रातील दिग्गज कंपन्याचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक प्रकल्प निर्माण होणार आहेत. त्यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहे. राज्याच्या किनारपट्टी भागात सुद्धा विशेष योजना राबविल्या जाणार आहेत. औद्योगिक विकास लक्षात घेता राज्यातील लघु व मध्यवर्ती बंदराच्या विकासाला चालना देण्यासाठी निधी उपलब्ध करून देणार. प्रवासी जेटी सुरू करण्याबरोबर विजयदुर्ग बंदर विकसित करणार.असे अनेक अभिनव प्रकल्प आम्ही राबवणार आहोत. सर्वच प्रकारची घुसखोरी रोखण्यासाठी ड्रोन सिस्टीम द्वारे संपूर्ण किनारपट्टीवर लक्ष ठेवून अवैध मासेमारीला प्रतिबंध बसणार आहे. सागरी किनाऱ्याच्या सुरक्षेसाठी अद्यावत अशा 10 स्टील गस्ती नौका मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस जी उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे जी उपमुख्यमंत्री आदरणीय अजित पवार जी यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम पूर्ण करणार आहे. असे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले.


