सिडनी : ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचा किताब राखण्यात इटलीच्या यानिक सिनरला यश आलं आहे. मागच्या वर्षी त्याने जेतेपद पटकावलं होतं. यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत यानिक सिनरने जर्मनीच्या अलेक्झांडर जेवरेवला पराभूत केलं. ऑस्ट्रेलियन ओपनच्या मागच्या मागच्या दोन आठवड्यात सिनरला आरोग्य विषयक तक्रारींनी ग्रासलं होतं. पण इतकं असूनही त्याच्या खेळावर काहीही परिणाम झाला नाही. अंतिम फेरीत त्याने अलेक्झांडर जेवरेवचा पराभव केला आणि जेतेपद मिळवलं. यानिक सिनर अंतिम सामना सरळ सेटमध्ये जिंकला. सिनरना हा सामना 6-3, 7-6(4), 6-3 ने जिंकला. दोन्ही खेळाडूंमध्ये हा सामना जवळपास 2 तास आणि 42 मिनिटं चालला. पण या सामन्यात त्याने अलेक्झांडरला डोकं वर काढूच दिलं नाही. त्यामुळे कमबॅकचा प्रश्नच उद्भवला नाही. यापूर्वी उपांत्य फेरीत थ्याने अमेरिकेच्या बेन शेल्टन याचा 7-6, 6-2, 6-2 ने पराभव केला.
यानिक नासिरने मागच्या 13 महिन्यात तिसऱ्यांदा ग्रँड स्लॅम किताब जिंकला आहे. यात त्याने युएस ओपन 2024 आणि मागच्या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपन 2024 स्पर्धेचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियन ओपनच्या इतिहासात सलग दुसऱ्यांदा जेतेपद मिळवणारा यानिक सिनर हा 11 वा खेळाडू ठरला आहे. तर सलग दोनदा हे विजेतेपद पटकावणारा तो जिम कुरियर (1992 आणि 1993) नंतरचा सर्वात तरुण खेळाडू बनला आहे. दुसरीकडे, अलेक्झांडर जेवरेवला पुन्हा एकदा ग्रँड स्लॅम विजेतेपदाने हुलकावणी दिली. अलेक्झांडर जेवरेव 2015 पासून ग्रँड स्लॅम खेळत आहे. आतापर्यंत तीनवेळा अंतिम फेरीपर्यंत धडक मारली. मात्र तिन्ही वेळेस त्याला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. जेवरेवने सहज अंतिम फेरी गाठली होती. कारण उपांत्य फेरीत त्याचा सामना नोवाक जोकोविच याच्याशी झाला होता. मात्र पहिल्या सेटनंतरच जोकोविचने माघार घेतली. त्यामुळे त्या थेट अंतिम फेरीत एन्ट्री मिळाली होती.


