Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

फार्मसी मॅनेजमेंट प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद.! ; महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिल ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर व सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट केमिस्ट असोसिएशन यांचे संयुक्त आयोजन.

कणकवली : महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिल ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर आणि सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट केमिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या फार्मसी मॅनेजमेंट प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या प्रशिक्षणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६८ फार्मासिस्टनी सहभाग घेतला. यात महिला फार्मासिस्टची उपस्थिती लक्षणीय होती.
या कार्यक्रमाच्या व्यासपिठावर विजयराव नाईक फार्मसी कॉलेजेचे प्राचार्य डॉ राजेश जगताप, डॉ सौ. स्नेहा जगताप, सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आनंद रासम, माजी अध्यक्ष अनिल पाटकर, खजिनदार, विवेक आपटे, दयानंद उबाळे, कमरुद्दीन शेख आदी उपस्थित होते.
औषध व्यवसायात वेगाने होणारे बदल, ड्रग अँड कॉस्मेटिकमध्ये होऊ घातलेले नविन बदल तसेच व्यवसायात येणाऱ्या भविष्यातील स्पर्धेला यशस्वीपणे सामोरे जाण्यासाठी प्रत्येक फार्मासिस्टने आपले ज्ञान अद्यावत ठेवणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे आपले ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी पर्यायाने भविष्यात आपल्या व्यवसायात येणाऱ्या स्पर्धेला आणि व्यावसायिक आव्हानांना तोंड देण्यासाठी आपला फार्मसीस्ट सक्षम व्हावा व्हावा. यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फार्मासिस्ट साठी फार्मसी मॅनेजमेंट प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विजयराव नाईक फार्मसी कॉलेजेचे प्राचार्य डॉ राजेश जगताप, डॉ सौ स्नेहा जगताप आणि त्यांचे सहकारी यांनी बहुमोल मार्गदर्शन केले.यावेळी आनंद रासम यांनी केमिस्ट हृदय सम्राट आप्पासाहेब शिंदे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संपूर्ण राज्यात राबवित असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी हा फार्मसी मॅनेजमेंट प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सर्व फार्मासिस्टना महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिलतर्फे विशेष सर्टिफिकेट वितरण करण्यात आले. यावेळी उपस्थित फार्मासिस्टनी आपले मनोगत व्यक्त करताना या फार्मसी मॅनेजमेंट प्रशिक्षणाचा उपयोग आपल्या रोजच्या प्रॅक्टिसमध्ये योग्य तो बदल घडवून आणण्यासाठी होईल असे सांगून या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिल आणि सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे आभार मानले.
या फार्मसी मॅनेजमेंट शिक्षणाचे नियोजन गुरुनाथ देसाई, निखिल पाटकर, प्रसाद बाणावलीकर, संदीप गावडे, मंदार भिसे, संतोष राणे, अमर गावडे, सचिन बागवे आणि जिल्ह्यातील सर्व केमिस्ट पदाधिकारी आणि कार्यकारी मंडळ सदस्य यांनी केले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles