सावंतवाडी : पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून जिल्हा मुख्यालय ओरोस येथे जनता दरबार आयोजित करण्यात आला असून आज या जनता दरबारात सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे प्रश्न मांडण्यात येणार आहेत. मात्र नेमकी आजच या भागाचे आमदार शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी मुंबई येथे चौकूळ गावच्या कबुलायत गावकर प्रश्नी मुंबई येथे बैठक आयोजीत केली असल्यामुळे जिल्हाधिकारी ,उपविभागीय अधिकारी व महसूल व वनविभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी या बैठकीसाठी मुंबई येथे गेले असून त्यामुळे या दोन्ही महत्वाच्या व जबाबदार खात्याचे प्रमुखच जर जनता दरबारात हजर नसतील तर सावंतवाडी विधानसभा मतदान संघासाठी आयोजीत करण्यात आलेला आजचा जनता दरबार केवळ फार्स ठरणार असून आपल्याला न्याय मिळेल आपले प्रश्न मार्गी लागतील या आशेवर पैसे व वेळ खर्च करून आलेल्या नागरिकांच्या पदरी केवळ निराशा पडणार असल्याचा आरोप मनसे जिल्हाध्यक्ष अँड. अनिल केसरकर यांनी केला आहॆ. एकाच दिवशी दोन्ही ठिकाणी बैठका ठेवून या दोन्ही मंत्र्यांनी जनतेच्या प्रश्नांपासून पळ तरी काढला असावा किंव्हा या दोन्ही मंत्र्यांमध्ये ताळमेळ तरी नसावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहॆ. महसूल व वनविभाग या महत्वाच्या खात्यांचे प्रमुख उपस्थित राहणार नसल्यामुळे सावंतवाडी विधानसभा मतदार संघासाठी पुन्हा सावंतवाडीतच नव्याने जनता दरबार भरविण्यात यावा अशी मागणी देखील मनसे जिल्हाध्यक्ष अँड. अनिल केसरकर यांनी केली आहॆ.
पालकमंत्री अन् शिक्षणमंत्री यांच्यात ताळमेळ नाही, जिल्ह्यातील अधिकारी वर्ग मुंबईला गेल्याने आजच्या जनता दरबारात प्रश्नांना वाली कोण? : मनसे जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर यांचा सवाल.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


