Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

तेथे कर माझे जुळती.! ; दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस साजरा करून आर्किटेक्ट समिता सावंतचे अनोखे सेलिब्रेशन.!

सावंतवाडी : साहस प्रतिष्ठान सिंधुदुर्ग दिव्यांग विकास व प्रशिक्षण केंद्र सावंतवाडी हे प्रशिक्षण केंद्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर येथे आहे. या प्रशिक्षण केंद्रामध्ये एकूण 65 दिव्यांग विद्यार्थी- विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत.

सौ.समिता पियुष सावंत ही सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.सतीश बागवे यांची सुकन्या आहे. आपल्या वडिलांचे सामाजिक कार्य पाहून तिच्याही मनामध्ये इच्छा निर्माण झाली व समिता सामाजिक क्षेत्रामध्ये उतरून आपल्या परीने मदतीचा हात पुढे करू लागली. यापुढील आपले सर्वच वाढदिवस आपण दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सहवासातच साजरे करणार असल्याचे तिने सांगितले.
आपला वाढदिवस तिने दिव्यांग विद्यार्थ्यांच्या समवेत साजरा केला तर त्याच दिवशी एका दिव्यांग विद्यार्थ्यांचा वाढदिवस होता त्या विद्यार्थ्यांचाही वाढदिवस तिने साजरा करून सदर विद्यार्थ्यांसाठी बसायला ज्यादम, खेळणी व काही वस्तू भेट वस्तू म्हणून दिल्या.
समिताने विद्यार्थ्यांप्रती दाखवलेली माया ममता पाहून साहस प्रतिष्ठानचे विश्वस्त व पालक वर्गाने तिचे तोंड भरून कौतुक व अभिनंदन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
संस्थेच्या अध्यक्षा रूपाली पाटील यांनी विद्यार्थ्यांना बसण्यासाठी 10 स्कूल बेंचची मागणी केली असता संस्थेच्या कार्यकर्त्या शरदिनी बागवे यांनी 10 स्कूल बेंच लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करेन अशी ग्वाही दिली.
याप्रसंगी दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणारे व त्यांची सेवा करणारे रूपाली पाटील,सखाराम नाईक, न्हानू देसाई, प्रवीण सूर्यवंशी, द्रोपती राहुल, विदिशा सावंत, पूनम गायकवाड मॅडम (MSW),
विद्यार्थिनी संजना सुभाटे ,(MSW)पूजा डोल्हारे (MSW) तसेच सार्वजनिक बांधकाम उप अभियंता सीमा गोवेकर ,सामाजिक बांधिलकीचे अध्यक्ष श्री सतीश बागवे, शरदिनी बागवे, रूपा मुद्राळे, रवी जाधव, व पालक वर्ग उपस्थित होते.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles