सावंतवाडी : कोल्हापूर येथे झालेल्या विभागीय शालेय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत चराठा येथील कु. हेमांगी गजानन मेस्त्री या विद्यार्थिनीने ८४ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत कु. हेमांगी मेस्त्री हिने २६५ किलो वजन उचलत प्रथम क्रमांक पटकावला.
कु. हेमांगी मेस्त्री हिची आता राज्यस्तरीय शालेय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कु. हेमांगी मेस्त्री ही माजगाव येथील श्री भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालयात इयत्ता नववीत शिकत आहे. कु. हेमांगी मेस्त्री हिने यापूर्वी अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. कु. हेमांगी मेस्त्री हिच्या उज्वल यशाबद्दल तिचे कोच मंगेश घोगळे तसेच श्री भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालयाचे संस्थाचालक, मुख्याध्यापक व शिक्षक कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
कोल्हापूर विभागीय शालेय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत हेमांगी मेस्त्री प्रथम! ; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली निवड.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


