कणकवली : विद्यामंदिर प्राथमिक विभाग हे बाल शिक्षणाचे उत्तम केंद्र आहे या विभागामार्फत विद्यार्थांच्या शैक्षणिक विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात . प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना सर्वकष असे मध्यान भोजन दररोज दिले जाते विद्यार्थांबरोबर पालकांचाही मोठा वाटा असतो म्हणून तृण धान्यांचे आहारात महत्व या विषयावर पालकांच्यासाठी पाककला स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेचे उद्घाटन सावडाव हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री आर. टी. सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ करंबळेकर मॅडम आणि त्यांचे सहकारी शिक्षक / शिक्षिका यांनी पालकांचा सहभाग घेऊन सुंदर नियोजन केले होते . पाककला प्रदर्शन उपक्रमाची पहाणी जेष्ठ शिक्षिका सौ संगीता साटम . श्री संदिप कदम श्री प्रसाद राणे श्री शेळके जे जे . सौ सावंत पी पी यांनी भेट दिली व सर्वांचे कौतुक केले .


