Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

…अन्यथा आमरण उपोषण..! – संतोष वरेरकर. ; देवगड ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय सेवा सुविधा देणारे कर्मचारी वर्ग तात्काळ भरणेबाबत सामाजिक कार्यकर्ते संतोष वरेरकर यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन व आमरण उपोषणाचा इशारा.!

देवगड : येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये डॉक्टर्स व सिस्टर आणि इतर कर्मचारी वर्ग तात्काळ भरणेबाबत सामाजिक कार्यकर्ते संतोष वरेरकर यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे विनंती केली आहे.

आपल्या निवेदनात श्री. वरेरकर म्हणतात, मी. श्री.संतोष बापू वरेरकर रा. वरेरी ता. देवगड जि. सिंधुदुर्ग एक समाजसेवक असून गेली कित्येक वर्षे समाजसेवेचे काम करीत आहे. मी या निवेदनाद्वारे आपल्याला असे सूचित करितो कि, ग्रामीण रुग्णालय देवगड येथे डॉक्टर्स व सिस्टर आणि इतर कर्मचारी वर्ग तसेच अद्यावत मशनरी उपलब्ध नाहीत त्यामुळे अपघाती रुग्ण, गरोदर महिला, यांचे अतोनात हाल होत आहेत. सदर दवाखान्यामधील अतिगंभीर रुग्णांना तात्काळ उपचार मिळणेसाठी देवगड ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याने सदर रुग्णांना सुमारे 80 किमी. रानबांबूळी ओरोस, सुमारे १५० किमी. कोल्हापूर, गोवा बांबूळी सुमारे १४० कि.मी. एवढे अंतर गाठावे लागते सदर रुग्णांना तेवढ्या वेळात रुग्णवाहिका (अम्बुलंस) न मिळाल्यास शक्यतो मिळतच नाही.  त्यामुळे देवगड येथील अपघाती रुग्ण किंवा गरोदर महिला आपला जीव गमावतात. त्यामुळे देवगड रुग्णालयात चांगल्या दर्जाचे डॉक्टर व सिस्टर जनतेचे होणारे हाल हे वेळेत निभावून जनतेची सेवा करावी सगळ्या गोष्टीचे राजकारण बाजूला ठेवून आज लोकांना ह्या देशात व महाराष्ट्रात आरोग्य व शिक्षणाची अतिशय गरज आहे.

आपण महाराष्ट्र सरकारने दिलेल्या सर्व सवलती बंद करून आरोग्य व शिक्षण दर्जेदार दिल्यास ह्या देशाची, महाराष्ट्रातील जनतेची चांगले आशीर्वाद मिळतील. कृपया वरील दिलेल्या निवेदनाचा जाणीवपूर्वक विचार करून आपल्या कार्यालायात अर्ज प्राप्त झाल्यापासून एक महिन्याच्या आत डॉक्टर व सिस्टर आणि इतर कमर्चारी वर्ग तात्काळ भरण्यात यावी. सदर निवेदनावर आपण दुर्लक्ष केल्यास मी आपल्याला पूर्वसूचना न देता ग्रामीण रुग्णालय देवगड येथे आमरण उपोषणास बसणार आहे. उपोषण कालावधीमध्ये माझ्या जीवाचे बरेवाईट झाल्यास संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र सरकारची राहील.

कळावे.!

                                                                           आपला विश्वासू

                                                                      श्री. संतोष बापू वरेरकर

                                                                          (समाजसेवक)

प्रति माहिती व उचित कार्यवहीसाठी –

1. मान.श्री. नितेशजी राणेसाहेब – पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्हा.

2. मान. श्री. प्रकाश आबीटकर साहेब, आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य

3. मान. अजितदादा पवार साहेब, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

4. मान. जिल्हाधिकारी साहेब, ओरोस सिंधुदुर्ग

5. मान. जिल्हा पोलीस अधिक्षक, ओरोस

6. मान. जिल्हा आरोग्य अधिकारी, ओरोस

7. मा. मुख्यकार्यकारी अधिकारी, ओरोस.

8. मा. तहसिलदार साहेब, देवगड

9. मा. पोलीस निरीक्षक, देवगड

10. मा. ग्रामीण रुग्णालय अधीक्षक, देवगड.

ADVT –

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles