सावंतवाडी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने भगवा सप्ताह निमित्त सावंतवाडी विधानसभेत ‘शिवसेना संपर्क यात्रा अभियान’ विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांच्या संकल्पनेतून 16 ऑगस्ट 2024 पासून सावंतवाडी तालुक्यामध्ये कोलगाव जिल्हा परिषद गटापासून सुरुवात होत आहे. सकाळी कोलगाव येथे उद्घाटन शिवसेना उपनेते तथा जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर व जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, जिल्हा समन्वयक चंद्रकांत गावडे, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाठ, महिला आघाडी विधानसभा संघटक सौ. सुकन्या नरसुले, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, प्रकाश गडेकर, तालुकाप्रमुख यशवंत परब व संजय गवस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे. तरी सावंतवाडी तालुक्यातील मोठ्या संख्येने शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका संघटक मायकेल डिसूजा यांनी केले आहे.
दि. १६ ऑगस्ट २०२४ रोजीचा दौरा पुढीलप्रमाणे…….
कोलगाव स. ९.३० वा.
कुणकेरी स. १०.३० वा.
आंबेगाव स. ११.३० वा.
करिवडे दु. १२.३० वा.
माडखोल दु. २.३० वा.
सांगेली दु. ३.३० वा.
सावरवाड संध्या. ४.३० वा.
कलंबिस्त संध्या. ५.३० वा.
वेर्ले संध्या. ६.३० वा.
शिरशिंगे संध्या ७.३० वा.


