सावंतवाडी : अकोला येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय शालेय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत खेमराज मेमोरिअल इंग्लिश स्कूल व डॉ. व्ही. के. तोरसकर कनिष्ठ महाविद्यालय, बांदा प्रशाळेतील वाणिज्य शाखेचा खेळाडू प्रणव भिकाजी गवस याने ६६ किलो वजनी गटात राज्य स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
त्याच्या या उत्तुंग यशाबद्दल बांदा हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक नंदकिशोर नाईक, क्रीडा शिक्षिका प्रा. सुमेधा सावळ, बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा कल्पनाताई तोरसकर, कार्याध्यक्ष डॉ. मिलींद तोरसकर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
ADVT –



