Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विविध कार्यक्रमांचे आयोजन.! ; १५ रूग्णवाहिकांचे लोकार्पण करण्याचा मानस! : माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर.

सावंतवाडी : महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस शिवसेनेच्यावतीने महसूल पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर येत्या पंधरा दिवसांत उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व खासदार नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत १५ रूग्णवाहिकांचे लोकार्पण करण्याचा मानस असल्याची माहिती राज्याचे माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. सावंतवाडी येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हा संघटक संजू परब उपस्थित होते.

आम. केसरकर पुढे म्हणाले, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्य खूप मोठे आहे. त्यांनी मुख्यमंत्री असताना अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले आहेत. विशेषतः महिलांसाठी लाडकी बहीण योजना, एसटी प्रवासात ५० टक्के सवलत, युवक, ज्येष्ठ, शेतकरी, रूग्णांसाठी त्यांनी विविध योजना राबविल्या. अशा लोकनेत्याचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आम्ही साजरा करणार आहोत. या निमित्ताने उद्या दि. ९ फेब्रुवारी रोजी सकाळी कार्यालयात केक कापून वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे.‌ तसेच मतदारसंघात मिठाई व फळ वाटप करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातही विविध कार्यक्रम होणार आहेत. संपूर्ण मतदारसंघासाठी एक भव्य क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून त्यात मतदारसंघातील क्रिकेटप्रेमींनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस महसूल पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येणार आहे. १३,१४ व १५ फेब्रुवारी रोजी महसूलच्या स्पर्धा होत आहेत. १६ फेब्रुवारी पासून जिल्हा परिषद निहाय पक्षाच्यावतीने महसूल दाखले वितरित करण्यात येणार आहेत अशी माहिती श्री. केसरकर यांनी यावेळी दिली. या सर्व कार्यक्रमांत कुडाळ मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच सहकार्य आम्हाला लाभले आहे. जिल्ह्यात त्यांच्या माध्यमातून देखील विविध कार्यक्रम होणार आहे असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, आम्ही महायुती म्हणून एकसंघपणे काम करीत आहोत. भाजप व शिवसेना समन्वयाने काम करणार असून मित्रपक्ष म्हणून चांगले संबंध ठेवण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. त्यामुळे शक्यतो उबाठा शिवसेनेतून येणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रवेश देण्यावर आमचा भर अधिक राहणार आहे. मात्र, भाजपातील काही लोक स्वतःहून प्रवेश करण्यास इच्छुक असतील तर त्या पक्षातील वरिष्ठांना विश्वासात घेऊन समन्वयाने तो निर्णय घेतला जाईल अशी माहिती त्यांनी दिली. तसेच बहुचर्चित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलबाबत या आठवड्यात काहीही झालं तरी निर्णय घेणारच असा ठाम विश्वास व्यक्त करत दीपक केसरकर म्हणाले, राजघराण्याशी आमची अंतिम चर्चा सुरू आहे. लवकरच करार पूर्ण होईल. मात्र, काही अडथळा आल्यास आहे त्याच इमारतीपैकी एखादी जूनी इमारत निर्लेखीत करून त्या जागी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात येईल. कारण, सद्यस्थितीत असलेल्या रूग्णालयात लगत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होणे रूग्णांच्या दृष्टीने सोयीस्कर असल्याने आम्ही तसा निर्णय घेत आहोत असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच सावंतवाडी शहरातील बसस्थानक बीओटी तत्त्वावर बांधण्याचे निश्चित झाले आहे. लवकरच आहे ते बसस्थानक निर्लेखित करून भव्य असे बसस्थानक उभे राहील अशी माहिती आम. दीपक केसरकर यांनी दिली..

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles