दोडामार्ग : आज दिनांक 08/02/2025 रोजी ग्रामीण रुग्णालय दोडामार्ग येथे अथायू हॉस्पिटल कोल्हापूर व ग्रामीण रुग्णालय दोडामार्ग यांच्यावतीने मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये अँजिओप्लास्टि , बायपास, मुतखडा कॅन्सर ऑपरेशन, हाडांची तपासणी यासंदर्भात तपासणी करण्यात आली. तसेच शासनाच्या विविध योजना बाबत माहिती देण्यात आली. वरिल शिबिरामध्ये जीवन रक्षा सिंधुदूर्ग चे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते श्री राजू मसुरकर यांनी मार्गदर्शन केले. वरील शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ग्रामीण रुग्णालय दोडामार्ग चे वैद्यकीय अधीक्षक डॉ आकाश एडके सर, श्री राजू मसुरकर सर , तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री बाबुराव धुरी व डॉ. रामदास रेडकर, डॉ. लक्ष्मण सर, डॉ. अभय सोळूखे सर, श्रीमती सुरेखा भणगे सिस्टर, श्री. सचिन मोहिते समुपदेशक व सर्व अधीपरिचारीका व ग्रामीण रुग्णालय दोडामार्गचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. तसेच अथायू हॉस्पिटल कोल्हापूरची टीम उपस्थित होती.
ADVT –



