Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

विराट परतणार, रोहित विश्रांती घेणार! ; कटकमध्ये टीम इंडियाची ‘प्लेइंग-११’ बदलणार?, जाणून घ्या कोण खेळणार?

कटक : नागपूरमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी टीम इंडियाचा प्लेइंग-11 जाहीर झाला, तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले. त्यात विराट कोहलीचे नाव नव्हते. कोहलीच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे आणि त्यामुळे तो पहिला सामना खेळला नाही. आता दुसरा सामना आज कटकमध्ये खेळला जाणार आहे. विराट परतणार की नाही याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान बीसीसीआयने जे सांगितले होते त्यानुसार, विराट गुडघ्याच्या दुखापतीमुळे फक्त पहिल्या एकदिवसीय सामन्यातून बाहेर आहे. दुसऱ्या सामन्यात त्याचे पुनरागमन निश्चित आहे. पण त्याचे पुनरागमन कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक गौतम गंभीरसाठी डोकेदुखी ठरली आहे.

पहिल्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहली बाहेर होता म्हणून श्रेयस अय्यरला संधी मिळाली. यशस्वी जैस्वालने पदार्पण केले. सामना जिंकणारी खेळी खेळून, अय्यरने सिद्ध केले की तो या फॉरमॅटमध्ये खेळण्यास पात्र आहे. त्याने 36 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 59 धावा केल्या. पदार्पण करणाऱ्या यशस्वी जैस्वालने 22 चेंडूत 15 धावा केल्या. कोहलीच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या शुभमन गिलने 87 धावा केल्या.

रोहित विश्रांती घेणार?

अय्यर आणि गिल यांनी ज्या पद्धतीने फलंदाजी केली, त्यानंतर त्यांना बाहेर ठेवणे अन्याय्य ठरेल. यशस्वीनेही पदार्पण केले होते आणि फक्त एका सामन्यानंतर त्याला वगळणे योग्य ठरणार नाही. यशस्वीला वगळल्याने त्याच्या आत्मविश्वासावर परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत, संघ व्यवस्थापन पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान सिडनी कसोटी सामन्यात वापरला गेलेला फॉर्म्युला वापरून पाहू शकते. त्या सामन्यात रोहितने स्वतःला बाहेर केले होते. सध्या रोहितचा फॉर्म चांगला नाहीये आणि म्हणूनच रोहित दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातून बाहेर पडला तर आश्चर्य वाटायला नको.

पण, ही शक्यता खूपच कमी आहे. कारण चॅम्पियन्स ट्रॉफी पाहता रोहितला जास्तीत जास्त सामने खेळायचे आहेत. अशा परिस्थितीत, यशस्वी बाहेर जाईल हे निश्चित आहे. केएल राहुलने चांगली कामगिरी केली नाही, पण तो यष्टीरक्षक म्हणून खेळेल हे निश्चित आहे.

गोलंदाजीत कोणता बदल होणार?

गोलंदाजीत कोणताही बदल होण्याची शक्यता दिसत नाही. मोहम्मद शमीचे एकदिवसीय पुनरागमन दमदार होते. हर्षित राणानेही आपल्या धारदार गोलंदाजीने इंग्लंडचे कंबरडे मोडण्यात मोठी भूमिका बजावली. रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव या त्रिकुटाचीही प्लेइंग-11 मध्ये निवड निश्चित झाली आहे.

भारताचा संभाव्य प्लेइंग – ११ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी.

 

ADVT –

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles