Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

वाहतूक पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील वेंगुर्लेकर यांचा नवी मुंबई येथे सत्कार!

सावंतवाडी : महामार्ग पोलीस मदत केंद्र कसाल, यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली नेमणूकीतील पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील दत्ताराम वेंगुर्लेकर यांनी ३६ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान २०२५ अंतर्गत केलेल्या कारवाईबद्दल सन्मानचिन्ह व प्रशस्तीप्रत्रक देवून त्यांचा महामार्ग पोलीस मदत केंद्र, पळस्पे, नवी मुंबई येथे सत्कार करण्यात आला.
त्यांच्या सर्वोत्कृष्ठ कामगिरीकरीता महाराष्ट्र राज्य पोलीस वाहतूक विभागाचे प्रमुख अपर पोलीस महासंचालक यांचे कार्यालयाकडून त्यांची निवड करण्यात येवून त्यांना महामार्ग पोलीस मदत केंद्र पळस्पे, नवी मुंबई येथील आयोजित रस्ता सुरक्षा अभियान-२०२५ कार्यक्रमात महाराष्ट्र राज्यातील पोलीस वाहतूक विभागाचे प्रमुख अपर पोलीस महासंचालक डॉ. श्री. सुरेश कुमार मेकला यांचे हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीप्रत्रक देवून त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे. यावेळी महामार्ग सुरक्षा पथक, रायगड परिक्षेत्रातील पोलीस अधीक्षक श्री. तानाजी चिखले , पोलीस उप अधीक्षक . श्रीमती ज्योत्स्ना रासम, म.सु.प., रत्नागिरी विभाग, पोलीस निरीक्षक श्रीमती दिपाली जाधव यांचे उपस्थितीत तसेच महामार्ग पोलीस केंद्र कसाल, जिल्हा-सिंधुदुर्ग, हातखंबा, चिपळूण, कशेडी, जिल्हा-रत्नागिरी, वाकण, महाड, बोरघाट, जिल्हा-रायगड, पळस्पे, नवीमुंबई या पोलीस मदत केंद्रांकडील प्रभारी पोलीस अधिकारी कार्यक्रमास उपस्थित होते.

महामार्गावर कर्तव्य करताना, वाहतूकीचे नियमन, अपघातग्रस्तांसाठी वेंळोवेळी केलेली मदत, जनजागृतीपर प्रबोधन कार्यक्रम शाला, महाविद्यालय आणि महामार्गावर उत्तम दर्जाचे केलेले असून, सन २०२४ सालात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-या वाहनधारकांवर त्यांनी सर्वाधिक १४६४ ई-चलन केसेसची कारवाई केलेली आहे तसेच ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह मधील ०६ वाहनधारकांवर कारवाई केल्या, त्यात सर्वांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कणकवली व सावंतवाडी न्यायालयातून द्रव्यदंडाची शिक्षा सुनावली आहे.
या कामी त्यांना महामार्ग पोलीस मदत केंद्र कसाल, कणकवली कडील प्रभारी पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारूगडे यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे.

ADVT –

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles