सावंतवाडी : माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ, पुणे यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या बारावीच्या
परीक्षेकरिता विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सावंतवाडी या केंद्रावर करण्यात आली आहे.
चालू वर्षी गैरमार्ग रोखण्याकरिता परीक्षेपूर्वी सर्व विद्यार्थ्यांची तपासणी (चेकींग) केली जाईल, त्यामुळे सर्व परीक्षार्थींनी परीक्षेपूर्वी किमान पाउणतास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे गरजेचे आहे. सकाळच्या सत्रात 10.30 नंतर व दुपारच्या सत्रात 2.30 नंतर येणार्या परीक्षार्थीना प्रवेश दिला जाणार नाही.
तसेच सर्व परीक्षार्थींना दहा मिनिटे अतिरिक्त वेळ वाढवून देण्यात आलेला आहे.
राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज या केंद्रावर बैठकव्यवस्था खालील प्रमाणे असेल.
विज्ञान शाखा – W006893-W007202,
कला शाखा – W013634-W013850,
वाणिज्य शाखा – W021617-W021939,
टेक्निकल – W024402-W024426, W400139
अशी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. या केंद्रावर एकूण 872 विद्यार्थ्यांची व्यवस्था केली आहे.
परीक्षार्थीनी वेळेत उपस्थित राहावे व सहकार्य करावे असे आवाहन विद्यार्थी,पालक आणि शिक्षक यांना केंद्रसंचालक डॉ. सुमेधा नाईक यांनी केले आहे.
ADVT –



