दोडामार्ग : दोडामार्ग तालुका लिजेंड्सच्या वतीने दरवर्षी दोडामार्ग तालुक्यातील क्रिकेट क्षेत्रात योगदान देणाऱ्या खेळाडूला ‘दोडामार्ग लिजेंड्स’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. पहिल्या वर्षी झरेबांबर फायटर संघाकडून प्रतिनिधित्व करणाऱ्या कृष्णा नाईक याला ‘दोडामार्ग लिजेंड्स २०२४’ सन्मान देण्यात आला होता. यंदा हा ‘दोडामार्ग लिजेंड्स २०२५’ सन्मान देऊन दामोदर भेडशी संघाकडून प्रतिनिधीत्व करणारे प्रसिद्ध समालोचक जय भोसले यांना सन्मानित करण्यात आले.
साटेली भेडशी येथील तालुका क्रीडा संकुल येथील मैदानावर नुकत्याच संपन्न झालेल्या दोडामार्ग तालुका लिजेंड्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत हा सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी स्पर्धा संयोजक लवू खानोलकर,बाबा मयेकर,संदेश रेडकर,निलेश तळणकर,राकेश महाजन,शाबी तुळसकर,कृष्णा नाईक,चंद्रा आयनोडकर,महेंद्र करमळकर यांनी या सन्मानासाठी जय भोसले यांचं नाव निश्चित केलं. यावेळी दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण,सिंधुदुर्ग जिल्हा हौशी संघटना जिल्हाध्यक्ष अनिल हळदिवे, उपाध्यक्ष अभय नाईक, मनोज पार्सेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
ADVT –




