सिंधुदुर्गनगरी : जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांच्या वतीने माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग श्रीम. कविता शिंपी मॅडम यांना जिल्ह्यातील शिक्षकेत्तर कर्मचारी प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सहविचार सभा आयोजित करण्यात यावी, याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये आश्र्वासित प्रगती योजना, वैद्यकीय बिल, कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक मान्यता, थकीत बिल, समायोजन याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली व संबंधित विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळचे कोल्हापूर विभागीय सचिव, तथा जिल्हा सचिव गजानन नानचे, सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटना जिल्हा उपाध्यक्ष सुहास देसाई, सावंतवाडी तालुका शिक्षकेतर कर्मचारी संघटना अध्यक्ष वैभव केंकरे आदी उपस्थित होते.
ADVT –




