Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

एसपीके महाविद्यालयात १४ फेब्रुवारीला ‘प्रोजेक्ट एक्स्पो 2k25’ राज्यस्तरीय प्रकल्प स्पर्धा व प्रदर्शन. ; माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या वतीने आयोजन.

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी संचलीत श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी यांच्या वतीने प्रोजेक्ट एक्सपो 2025 चे आयोजन करण्यात आले आहे .
ही स्पर्धा माहिती तंत्रज्ञान आणि संबंधित क्षेत्रातील विद्यार्थ्यांना त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना आणि उपाय सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आली आहे.

ही स्पर्धा दिनांक: 14 फेब्रुवारी 2025 होणार आहे.
▪️ नोंदणी लिंक :
https://forms.gle/Vmq2j3QebU4bbcGz6
1. प्रकल्प स्पर्धा
पात्रता: IT/CS/PHYSICS/ELECTRONICS/MECHATRONICS विभाग/फॅकल्टी/कॉलेजमधील सर्व डिप्लोमा/B.E./UG/PG विद्यार्थी
1. IOT/इलेक्ट्रॉनिक आधारित प्रकल्प
2. अॅप्लिकेशन आधारित प्रकल्प
स्पर्धेचे नियम.
1. प्रत्येक संघात जास्तीत जास्त 2 सदस्यांना परवानगी आहे.
2. प्रत्येक संघाला प्रकल्पाचे सादरीकरण व कार्यप्रणाली दाखवण्यासाठी 10 मिनिटे दिली जातील.
3. प्रकल्प चालवण्यासाठी लागणारी पायाभूत सुविधा/सॉफ्टवेअर संघाने तयार ठेवणे आवश्यक आहे.
4. प्रवेश शुल्क: प्रत्येक संघासाठी ₹300/-
विजेत्यांसाठी बक्षिसे
1. प्रथम पारितोषिक: ₹7000/- रोख, पदक व ट्रॉफी
2. द्वितीय पारितोषिक: ₹5000/- रोख, पदक
3. तृतीय पारितोषिक: ₹3000/- रोख, पदक
▪️ महत्वाची तारीख:
14 फेब्रुवारी 2025, सकाळी 10.00 वाजता
जिमखाना हॉल, एस.पी.के. कॉलेज, सावंतवाडी
▪️ पैसे भरण्याची पद्धत:
प्रवेश शुल्क: ₹300/- प्रत्येक प्रकल्पासाठी
GPay क्रमांक:
Nida Baig
7028796473
UPI ID: nidabaig964-1@oksbi
पैसे भरल्यानंतर, Google Form मध्ये स्क्रीनशॉट अपलोड करा.
शंका/प्रश्नांसाठी विद्यार्थी
समन्वयकाना संपर्क साधा.
या प्रोजेक्ट एक्सपो स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.डी.एल भारमल यांनी केले आहे.
या स्पर्धेसाठी
मिसेस अक्षता गोडकर,
विभाग प्रमुख, माहिती तंत्रज्ञान विभाग,
एस.पी.के. कॉलेज, सावंतवाडी व सहकारी यांनी विशेष मेहनत घेतली आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles