Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

दिवा – रोहा ‘मेमू’ वीरपर्यंत चालवाव्यात.! ; अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीची मध्य रेल्वेकडे मागणी.

सावंतवाडी : वीर रेल्वे स्टेशन हे रायगड जिल्हातील मध्यवर्ती ठिकाण असून स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडच्या नजीकचे शहर आहे.तसेच कोकण रेल्वे मार्गावरील गर्दी कमी करण्यासाठी अशा मेमू २ेल्वे चालवण आवश्यक आहे. दिवा ते पनवेल / पेन / रोहा मेमू रेल्वेच्या दिवसातून २० फेऱ्या होत असून त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे,रायगड जिल्हयातील वीर जवळील महाड हे शिवकालीन ऐतिहासीक वारसा लाभलेले शहर आहे,त्यामुळे वीर रेल्वे स्टेशनला पर्यटणदृष्ट्या खूप महत्व प्राप्त झालेले आहे.तसेच पनवेल ते वीर दरम्याने रेल्वेचा दुहेरी मार्गही आहे.व वीर येथे ४ फलाटही आहेत.मुंबई ते रोहा हा रेल्वे मार्ग मध्य रेल्वेच्या अखत्यारित येतो तर रोहा ते वीर पर्यंतचा रेल्वेमार्ग कोकण रेल्वेच्या अखत्यारित येतो.तरी कृपया मध्य रेल्वेवरील दिवा ते पनवेल / पेन / रोहा आणि पश्चिम रेल्वेवरील वसई ते पनवेल दरम्याने धावणाऱ्या सर्व मेमू रेल्वे कोकण रेल्वे मार्गावरील वीर स्थानकापर्यंत चालवाव्यात,अशी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबई च्या वतीने मध्य रेल्वेकडे मागणी करण्यात आली आहे.

दिवा ते पनवेल किंवा डहाणू / वसई रोड ते पनवेल दरम्याने धावणाऱ्या मेमू रेल्वेला वीर स्टेशनपर्यंत चालवल्यास कोकणातील रायगड जिल्हामध्ये पर्यटणासाठी जाणाऱ्या १) रायगड किल्ला २) महाडचे चवदार तळे ३) चौल येथील गरम पाण्याची कुंडे ४) गांधरपाळे लेणी ५) तलोशीचे रांगूमाता देवस्थान ६) वालनकोंड ७) पाचाड येथील जिजाऊंची समाधी अशा ऐतिहासीक स्थळांना भेट देण्यासाठी वीर हे मध्यवर्ती व जवळचे स्टेशन आहे,तरी मध्य रेल्वे,पश्चिम रेल्वे व कोकण रेल्वे यांनी प्रवाशांच्या मागणीचा सहानुभूतिपुर्वक विचार करावा असे सेक्रेटरी श्री.यशवंत जडयार यांनी सांगितले.

दिवा येथील फेऱ्या वीर स्टेशनपर्यंत चालवाव्यात.
१) दिवा रोहा ( ६१०११ ) ८.४५ am, २) दिवा पनवेल ( ६१०१७ ) ९.१० am, ३) दिवा पेन ( ६१०२३ ) ९.४० am, ४) दिवा पेन ( ६१०१९ ) ११.२० am, ५) दिवा रोहा ( ६१०१५ ) ६.४५ am, ६) दिवा पेन ( ६१०२५ ) ७.५० am, ७) दिवा रोहा ( ६१०१३ ) ८.०० am

वसई रोड पनवेल मेमू :
८) डहाणू पनवेल ( ६९१६४ ) ५.२५ am, ९) वसई पनवेल ( ६९१६८ ) १२.१० pm, १०) वसई पनवेल ( ६९१६६ ) ४.४० pm

निवेदनावर अध्यक्ष श्री.शेखर बागवे व सेक्रेटरी श्री.यशवंत जडयार यांनी सह्या केल्या असून त्याच्या प्रति कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक श्री.संतोषकुमार झा,जनरल मॅनेजर : पश्चिम रेल्वे,खासदार श्री.सुनिल तटकरे,खासदार श्री.नारायण राणे व खासदार श्री.हेमंत सावरा यांना पाठवल्या आहेत.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles