वडोदरा : वुमन्स प्रीमियर लीग 2025 स्पर्धेतील पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. दव फॅक्टर आणि खेळपट्टीचा अंदाज असल्याने आरसीबीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण गुजरात टायटन्सने आरसीबीच्या गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला. 20 षटकात पाच गडी गमवून 201 धावा केल्या आणि विजयासाठी 202 धावांचं आव्हान दिलं. वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील पाचवी मोठी धावसंख्या आहे. गुजरातने 5 गडी गमवून 201 धावा केल्या. यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात 2023 मध्ये रंगलेल्या सामन्यात 223 धावा झाल्या होत्या. तर 2023 मध्येच दिल्ली विरुद्ध युपी वॉरियर्स या सामन्यात 211 धावा, 2023 मध्येच मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स यांच्यात रंगलेल्या सामन्यात 207 धावा, 2023 मध्ये रंगलेल्या गुजरात विरुद्ध आरसीबी सामन्यात 201 धावा झाल्या होत्या.
या सामन्यात चौकार आणि षटकारांचा नुसता वर्षाव झाला. एशले गार्डनरने आरसीबीविरुद्ध 8 षटकार ठोकत सोफी डिव्हाईनच्या विक्रमाशी बरोबरी केली. सोफी डिव्हाईनने 2023 मध्ये गुजरात जायंट्स विरुद्ध एकाच सामन्यात 8 षटकार ठोकले होते. दुसरीकडे, या सामन्यातील एका डावात एकूण 10 षटकार मारले गेले. एका षटकाराने फक्त विक्रम हुकला. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात 2024 मध्ये रंगलेल्या सामन्यात 11 षटकार एका डावात आले होते. दरम्यान, गार्डनर आणि डॉटिन या जोडीने 12.96 चा धावगती हा 50 हून अधिक धावांची भागीदारी केली. 31 चेंडूत 67 धावा ही गुजरात जायंट्समधील सर्वाधिक धावसंख्या आहे.गुजरात जायंट्सकडून एशले गार्डनरने सर्वाधिक नाबाद 79 धावांची खेळी केली. तिने 37 चेंडूत 8 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 79 धावा केल्या. त्यानंतर बेथ मूनीने 42 चेंडूत 8 चौकाराच्या मदतीने 56 धावा केल्या.
ADVT –
https://satyarthmaharashtranews.com/9537/