Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

कुडाळ येथे २५ रोजी रंगणार ‘खेळ मर्दानी छातीचा, खेळ मराठी मातीचा.!’ ; भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन, मनसे सिंधुदुर्ग व स्वस्तिक प्रतिष्ठानचा पुढाकार.

कुडाळ : महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सिंधुदुर्ग आणि स्वस्तिक प्रतिष्ठान सामाजिक संस्था (रजि.) त्यांच्या संयुक्त विद्यामाने. हौशी कबड्डी संघटना, सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने प्रकाशझोतातील निमंत्रित संघाच्या कबड्डी स्पर्धा २०२५ चे आयोजित केल्या आहेत. मंगळवार दि.२५ फेब्रुवारी सायं ६ वा. या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. स्पर्धा कुडाळ तहसीलदार ऑफिस शेजारील मैदानात होणार आहेत.
स्वस्तिक प्रतिष्ठान मागील सहा वर्षे शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य, सामाजिक उपक्रम घेत असून यावर्षी भव्य कबड्डी सामने आयोजन करीत आहे.

बक्षीसे –

या स्पर्धेत प्रथम क्रमांक ११,१११/ रोख व चषक.
द्वितीय क्रमांक ७,७७७/ रोख व चषक.
तृतीय क्रमांक ३,३३३/ रोख व चषक,
चतुर्थ क्रमांक ३,३३३/ रोख व चषक.
तसेच वैयक्तिक स्वरुपात अष्टपैलू खेळाडू – चषक ,
उत्कृष्ट चढाई खेळाडू – चषक.
उत्कृष्ट पकड खेळाडू – चषक.

अशी भरघोस बक्षिसे आहेत.
तरी या स्पर्धेकरिता क्रीडा प्रेमी, खेळाडू तसेच क्रीडा रसिक यांनी उपस्थित राहून रोमांचक सामान्यांचा आनंद घ्यावा, असे आवाहन मनसे पदाधिकारी आणि स्वस्तिक प्रतिष्ठान अध्यक्ष सचिन गुंड याच्यावतीने करण्यात आले आहे.

ADVT –

 

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles