Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

अफगाणिस्ताने ‘साहेबांना’ दाखवला घरचा रस्ता.! ; अफगाणिस्तानचा रंगतदार सामन्यात ८ धावांनी विजय, इंग्लंडचं पराभवासह पॅकअप.

लाहोर : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज रोमहर्षक सामना पाहायला मिळालाय. अफगाणिस्तानने इंग्लंडचा 8 धावांनी पराभव केलाय. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या अफगाणिस्तानच्या संघाने इब्राहिम झद्रानच्या 177 धावांच्या खेळीच्या जोरावर 325 धावांचा डोंगर गाठला होता. मात्र, प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 317 धावाच करु शकला. विशेष म्हणजे वर्ल्डकपनंतर अफगाणिस्तानच्या संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये देखील इंग्लंडला पराभवाची धूळ चारली.

इंग्लंडचा संघ चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर –

अफगाणिस्तानने इंग्लंडचा 8 धावांनी पराभव तर केलाच आहे. मात्र, आता इंग्लंडचा संघ चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर पडला आहे, तर अफगाणिस्तानने उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. अफगाणिस्तान संघाने या सामन्यात प्रथम खेळताना 325 धावा केल्या होत्या. अफगाणिस्तानकडून इब्राहिम झद्रानने 177 धावांची ऐतिहासिक खेळी केली. प्रत्युत्तरात जो रूटने इंग्लंडकडून शानदार शतक झळकावले, पण इंग्लंडला सामन्यात विजय मिळवता आलेला नाही.

इब्राहिम झद्रानच्या शतकी खेळीने साहेबांना बाहेरचा रस्ता –

अफगाणिस्तानकडून इब्राहिम झद्रानने 177, शाहिदीने 40, अझमतुल्लाहाने 41 तर मोहम्मद नबी ने 40 धावा करत धावांचा डोंगर उभा केला.  इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने 3 तर लिविंगस्टोनने 2 विकेट्स पटकावल्या. अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. इब्राहिम झद्रानने या सामन्यात 177 धावांची खेळी करत अनेक विक्रम केले आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात अफगाणिस्तानसाठी शतक झळकावणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. यासह तो चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक वैयक्तिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. झद्रानने 177 धावांच्या खेळीत 12 चौकार आणि 6 षटकार लगावले.

दरम्यान, अफगाणिस्तानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने सुरुवातीला विकेट्स गमावण्यास सुरुवात केली होती. इंग्लंडकडून जो रुटने 120 धावा करत झुंज दिली. मात्र, जो रुट शिवाय इंग्लंडच्या एकाही खेळाडूला 50 धावांचा टप्पा गाठता आलेला नाही. रुट शिवाय, जॉस बटलर आणि बेन डकेटने प्रत्येकी 38 धावांचे योगदान दिले.

ADVT –

 

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles