दुबई : टीम इंडियाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील साखळी फेरीत विजयी हॅटट्रिक पूर्ण केली आहे. टीम इंडियाने या स्पर्धेमधील साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडवर 44 धावांनी विजय मिळवला आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडला विजयासाठी 250 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी चिवट बॉलिंग करत न्यूझीलंडला 45.3 ओव्हरमध्ये 205 धावांवर गुंडाळलं आणि विजय मिळवला. मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती हा टीम इंडियाच्या विजयाचा खरा हिरो ठरला. वरुणने चॅम्पियन्स ट्रॉफी पदार्पणात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडला 5 झटके दिले.
ADVT –


सोने तारण कर्ज योजना.! – सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग, यांची अभिनव योजना.


