Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

कपडे फाडले, चेहऱ्यावर लघुशंका केली, हसून सेल्फी घेतली अन्… ; संतोष देशमुखांच्या हत्येची क्रूरता पाहून तुम्हीही हादराल!

बीड : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा पुरावा आता समोर आला आहे. संतोष देशमुखांना मारहाण करताना, त्यांची निर्घृण हत्या करतानाचे काही फोटो आणि व्हिडीओ आता समोर आले आहेत. या फोटोत संतोष देशमुखांची हत्या कशी करण्यात आली, त्यांना कशा पद्धतीने अमानुष मारहाण करण्यात आली, याचा घटनाक्रम समोर आला आहे. या हत्येच्या कटात सहभाग असलेले आरोपीही या फोटोत दिसत आहेत. विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटे, कृष्णा आंधळे हे सर्वजण या फोटोत पाहायला मिळत आहे.

संतोष देशमुखांच्या हत्येची क्रूर कहाणी –

  • पहिल्या फोटोत जनावरांप्रमाणे मारहाण केल्यानंतर जयराम चाटे संतोष देशमुख यांची पँट काढतोय.
  • दुसऱ्या फोटोत आरोपी महेश केदार हा त्या दृष्याचे सेल्फी घेत हैवानासारखा हसतो.
  • तिसऱ्या फोटोत अमानुष मारहाणीनंतर संतोष देशमुख अर्धमेले झाले, तेव्हा प्रतिक घुले देशमुखांच्या छातीच्या दोन्ही बाजूला पाय टाकून चेहऱ्यावर लघवी करतो.
  • सुदर्शन घुले देशमुखांच्या शेजारी उभा राहून फोटो काढतो. त्यावेळी हैवानी आवेश चेहऱ्यावर दिसतोय.
  • मारेकरी जयराम चाटे देशमुखांच्या अंगावर शर्ट ओरबाडून काढतो. काढलेला शर्ट हातात धरुन हसतो.
  • यानंतर मारेकरी पाईप आणि वायरने देशमुखांवर वार करतात. लाथा-बुक्क्यांनी मारहाण शिवीगाळ होते.
  • वायरीसारख्या हत्याराचं बंडल देशमुखांच्या पाठीवर मारुन वार केले जात आहेत
  • दृश्य पाहून जल्लाद – राक्षसांना पाझर फुटेल, अशावेळी महेश केदार सारं हसत हसत शूट करतो.
  • मारहाणीनंतर सुदर्शन घुले हा सगळ्यांचा बाप आहे, असं देशमुखांनी म्हणावं, यासाठी त्यांना जबरदस्ती केली जाते.
  • संतोष देशमुखांना अंतर्वस्त्रावर बसवून त्यांच्या पाठीवर पाईपने मारहाण होते.
  • हैवानासारख्या मारहाणीनंतर देशमुखांना शरीरातील रक्त ओघळून त्यांच्या तळपायापर्यंत आल्याचे दिसतंय

बीडमधील वातावरण पुन्हा एकदा तापले

संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे 8 फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बीडमधील वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. हे सर्व फोटो संवेदनशील आहेत. त्यामुळे हे फोटो आम्ही प्रसिद्ध करु शकत नाही. तसेच ‘टीव्ही 9 मराठी’ या फोटोंना दुजोरा देत नाही.

बीडचे एसपी नवनीत कॉवत यांचे आवाहन –

हे फोटो व्हायरल झाल्यानंतर आता बीडचे एसपी नवनीत कॉवत यांनी जनतेला आवाहन केले आहे. समाज माध्यमांवरील फोटो मन विचलित करणार आहे. हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. जनतेने कायदा हाती घेऊ नये, असे आवाहन बीडचे एसपी नवनीत कॉवत यांनी केले आहे.

ADVT –

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles