Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

लंडनमध्ये चित्रीत झालेलं श्रीजय क्रिएशन प्रस्तुत ‘प्रेमाची शिट्टी’ हे रोमँटिक गाणं प्रदर्शित! ; सोशल मीडियावर गाणं व्हायरल !

  • मुसाफिरा फेम चेतन मोहतुरे आणि अभिनेत्री सुप्रिया चव्हाण यांचे ‘प्रेमाची शिट्टी’ हे रोमँटिक गाणं प्रदर्शित!

. लंडनमधील नयनरम्य ठिकाणी झाले ‘प्रेमाची शिट्टी’ गाण्याचे चित्रीकरण.

मुंबई : मराठी संगीतविश्वात आजकाल वेगवेगळ्या धाटणीची गाणी प्रदर्शित होत आहेत. त्यामुळे मराठी संगीताचा प्रभाव भारतात नव्हे तर परदेशातही पडताना दिसतोय. आपली मराठी गाणी परदेशातही चित्रीत होत आहेत. श्रीजय क्रिएशन प्रस्तुत ‘प्रेमाची शिट्टी’ हे रोमँटिक गाण नुकतच प्रदर्शित झाल आहे. तर विशेष म्हणजे हे गाण यूनाइटेड किंगडम मधील लंडन या शहरात चित्रीत झाले आहे.

रोमँटिक गाणं ‘प्रेमाची शिट्टी’ निखिल रानडे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेलं आहे शिवाय ते सिनेमॅटोग्राफर देखील होते. हे गाण आपल्या भावनिक कथानक आणि हृदयस्पर्शी सुरावटींमुळे प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेण्यास सज्ज आहे. या गाण्यात अभिनेता चेतन मोहतुरे आणि अभिनेत्री सुप्रिया चव्हाण यांची नवीन आणि आकर्षक जोडी पाहायला मिळेल. गाण्याचे बोल आणि निर्मिती जय पालवकर यांनी केली आहे. तर या गाण्याच संगीत निहार शेंबेकर आणि रॅपर A.K.A शार्क (शार्दूल नितीन साखळे) याने केले आहे.

निर्माते जय पालवकर ‘प्रेमाची शिट्टी’ गाण्याच्या प्रोसेसविषयी सांगतात,”दिग्दर्शक निखिल रानडे यांनी लंडनमध्ये गाण चित्रीत करण्याची संकल्पना मांडली. आणि गाण सुद्धा थोड वेस्टर्न टाईपमध्ये होत. तसेच रॅपर A.K.A शार्क (शार्दूल नितीन साखळे) याचा या गाण्यात एक रॅप देखील सादर केला आहे. त्यामुळे हे गाण अजूनच आकर्षक दिसत आहे. सोशल मीडियावर प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. प्रेक्षकांचे असेच प्रेम कायम आम्हाला मिळो हीच सदिच्छा.!”

मुसाफिरा फेम अभिनेता चेतन मोहतुरे गाण्याच्या चित्रीकरणाचा अनुभव सांगताना म्हणाला, ”आम्ही लंडनमध्ये रात्री शूट करत होतो त्यावेळेस खूप पाऊस होता. आम्ही एका लोकेशनवर २ तास ट्रॅव्हल करून गेलेलो तिथे शूट सुरू करणार तेवढ्यातच सिक्युरिटी गार्डस अचानक आले आणि त्यांनी तिथे शूट न करण्यास सांगितले. मग आम्ही दुसऱ्या लोकेशनवर जाऊन गाण शूट केल.”

अभिनेत्री सुप्रिया चव्हाण तिच्या पहिल्याच गाण्याविषयी सांगते, “नृत्यदिग्दर्शक म्हणून माझं करिअर आतापर्यंत अप्रतिम राहिलं आहे. १२ वर्षे मी नृत्यदिग्दर्शक म्हणून काम करत आहे, मी जगभर नृत्य शिकवले आहे. “प्रेमाची शिट्टी” हे गाण माझ्यासाठी फारच स्पेशल आहे. अभिनेता चेतन मोहतुरे यांच्यासोबत मी पहिल्यांदाच काम करत आहे. या गाण्याच चित्रीकरण करताना आम्ही फार धम्माल केली.”

दिग्दर्शक निखिल रानडे गाण्याविषयी सांगतो,”मी गेली ३ वर्ष लंडनमध्ये राहत आहे. आणि मी ३० ते ४० गाण्यांचे दिग्दर्शन केले आहे. श्रीजय क्रिएशन सोबत मी याआधी स्पर्श माझा हे गाण चित्रीत केले आहे. त्या नंतर आता प्रेमाची शिट्टी हे गीत केले आहे. हे गाण आम्ही लंडनमध्ये रात्री पावसात शूट केल आहे.”

प्रेमाची शिट्टी या गाण्याचा ऑडिओ सर्व प्रमुख स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर ऐकता येईल. शिवाय प्रेम आणि दिलखेचक संगीताचा हा सुंदर प्रवास तुम्ही नक्की पाहा!

ADVT –

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles