वेंगुर्ले : वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीतील परुळेकर दत्त मंदिराला लागुन असलेली व्हाळी मोडकळीस आल्यामुळे ती नवीन बांधावी अशी मागणी तिकडील नागरिक गेली दोन – तीन वर्षे सातत्याने नगरपरिषद प्रशासनाकडे करत होती . व्हाळी जीर्ण झाल्यामुळे व्हाळीमधून जाणारे सांडपाणी हे विहीरीत जात होते .त्याबाबत ही तक्रार नगरपरिषदे कडे केली होती . परंतु नगरपरिषद प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे त्याचा फटका मडकईकर कुटुंबाला बसला , दैव बलवत्तर म्हणून जिवितहानी झाली नाही . घरच्या मंडीळींची आंघोळ झाल्यावर सकाळी १० – ३० च्या सुमारास बाथरूम ची भिंत कोसळली. त्यामुळे मडकईकर कुटुंबाचे आर्थिक नुकसान झाले .
सदर घटना घडल्यानंतर ताबडतोब भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळु देसाई यांनी भेट देऊन नगरपरिषद मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या निदर्शनास आणून ताबडतोब बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवावे अशी मागणी केली असता नगरपरिषद बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता गणेश कांबळी व वाॅटर सप्लायचे सागर चौधरी यांनी सदर घटनेची पहाणी करुन संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांना ताबडतोब झालेली पडझड बाजुला करावी असे निर्देश दिले . बाथरूमची भिंत कोसळून मडकईकर कुटुंबांचे आर्थिक नुकसान झाले मुळे नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी मडकईकर कुटुंबांने केली आहे.
वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीतील धोकादायक व्हाळीमुळे मडकईकर कुटुंबाच्या बाथरुमची भिंत कोसळली.! ; सुदैवाने जिवीतहानी टळली.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


