Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

भीम चषक – २०२५ क्रिकेट स्पर्धेत ब्लू स्टार सावंतवाडी संघ विजेता.! ; झाराप संघ ठरला उपविजेता, लवलेश कांबळी ठरला मालिकावीर.

सावंतवाडी : ब्लू स्टार स्पोर्ट क्लब, सावंतवाडी आयोजित भीम चषक -२०२५ क्रिकेट स्पर्धेच्या चषकावर ब्लू स्टार, सावंतवाडी संघाने चमकदार कामगिरी करत आपले नाव कोरले असून, झाराप संघ उपविजेता ठरला आहे. या स्पर्धेत एकूण 16 संघानी सहभाग घेतला होता. तीन दिवस चालेल्या या साखळी क्रिकेट स्पर्धेत ब्लू स्टार सावंतवाडी आणि झाराप संघाने बहारदार खेळी करत अंतिम सामन्यात धडक मारली होती. ब्लू स्टार सावंतवाडी आणि झाराप संघात झालेल्या अखेरच्या लढतीत यश नाईक यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सामनावीर हा पुरस्कार पटकावला तर संपूर्ण स्पर्धेत अष्टपैलू कामगिरी करत ब्लू स्टार संघाचा लवलेश कांबळी यांनी संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. त्याने मालिकावीर हा पुरस्कार पटकावला तसेच संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज म्हणून निखिल कांबळे, ब्लू स्टार सावंतवाडी संघ, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून आर्यन, झाराप संघ तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक प्रसाद वाडकर, ब्लू स्टार सावंतवाडी यांनी पटकावला.

ब्लू स्टार स्पोर्ट क्लब सावंतवाडी आयोजित भीम चषक पर्व 2 चे प्रथम पारितोषिक आणि चषक तसेच इतर पारितोषिके भाजप महाराष्ट्र कार्याध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांनी पुरस्कृत केले होते. तर द्वितीय पारितोषिक अँड. अनिल निरवडेकर यांनी पुरस्कृत केले होते.यावेळी अँड अनिल निरवडेकर, माजी नगरसेवक विलास जाधव, पी एस आय सावंतवाडी पोलिस ठाणे प्रमोद पाटील, ज्येष्ठ पत्रकार सीताराम गावडे आणि ब्लू स्टार स्पोर्ट क्लब सावंतवाडी चे सर्व पदाधिकारी व अन्य मान्यवर उपस्थितीत होते.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles