Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

सुनीता विलियम्स यांची अंतराळातून होणार सुटका? ; आज झेपावणार स्पेसएक्सचं यान.

नवी दिल्ली :  तब्बल आठ महिन्यांहून अधिक काळ अंतराळ स्थानकात असलेल्या भारतीय वंशाच्या नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स लवकरच पृथ्वीवर परत येणार आहेत. सुनीता विल्यम्स गेल्या 8 महिन्यांपासून अवकाशात अडकल्या आहेत. आता दिनांक 16 ते 19 मार्चदरम्यान त्या पृथ्वीवर येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. बुच विल्मोर यांनी सीएनएनला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांच्या पुनरागमनाबद्दल माहिती दिली आहे. बुच विल्मोर देखील सुनीतासोबत या मोहिमेवर गेले आहेत.

आज (12 मार्च) ‘ड्रॅगन’ स्पेसक्राफ्टद्वारे स्पेस एक्सचा ‘क्रू 10’ म्हणजे अंतराळवीरांचं दहावं पथक स्पेस स्टेशनच्या दिशेने झेपावेल. नासाच्या फ्लोरिडामधल्या केनेडी स्पेस सेंटरमधून हा लाँच होईल. गुरुवारी 13 मार्चला हे ड्रॅगन स्पेसक्राफ्ट इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला डॉक होईल (हे यान अंतराळाला जोडले जाईल) यानंतर हे यान अंतराळ स्थानकापासून विलग होईल आणि 16 ते 19 मार्चदरम्यान क्रू 9 मिशनच्या अंतराळवीरांसोबतच बोईंगच्या मोहीमेच्या अडकलेल्या दोन अंतराळवीरांना पृथ्वीवर परत घेऊन येईल.

या पथकात NASAच्या अ‍ॅन मॅकक्लेन (कमांडर) आणि निकोल एयर्स (पायलट) यांच्यासह JAXA (जपान अंतराळ संशोधन संस्था) चे टाकुया ओनिशी आणि Roscosmos (रशियन अंतराळ संस्था) चे किरील पेस्कोव यांचा समावेश आहे. ड्रॅगन स्पेसक्राफ्ट याचा वापर अंतराळ स्थानकातून अंतराळवीरांची ने-आण करण्यासाठी केला होतो. ‘इलॉन मस्क’ यांच्या खासगी अंतराळ कंपनीत याची निर्मिती केली गेली आहे.

दि. 5 जून 2024 रोजी सुनीता विल्यम्स आणि त्यांचा सहकारी बॅरी बुच विल्मोर हे दोघे अंतराळवीर बोईंग स्टारलायनरच्या चाचणीच्या मोहिमेसाठी अंतराळात गेले होते. त्यांनी जुलैमध्ये स्पेस स्टेशनवर पोहोचल्यानंतर, एक पत्रकार परिषदेत लोकांना ते आपल्या कामात व्यस्त आहेत, दुरुस्ती आणि संशोधनात मदत करत आहेत असा विश्‍वास व्यक्त केला होता. तेव्हा त्यांचा 13 जून 2024 रोजी परतण्याचा निर्णय झाला होता. पण दुर्दैवाने हे दोघे अंतराळ स्थानकात अडकले होते.

सुनीता विल्यम्स आणि बॅरी बुच जूनमध्ये अंतराळ स्थानकावर पोहोचले. तथापि, डॉकिंग करण्यापूर्वी फ्लाइटला हेलियम गळती आणि थ्रस्टर निकामी झाले. नासाच्या वैज्ञानिकांनी यानातील बिघाड दुरुस्त करण्याचे प्रयत्न केले, मात्र त्यात त्यांना यश आले नाही. अखेर दोन्ही अंतराळवीरांना न घेताच यान पुन्हा पृथ्वीवर परतले आणि त्यांचे परतीचे सर्व रस्ते बंद झाले. आणि त्यांचा आठ दिवसांचा मुक्काम तब्बल आठ महिन्यांवर गेला.

ADVT –

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles