Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा रवींद्र खेबुडकर यांनी स्विकारला पदभार.

सिंधुदुर्गनगरी :  सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रवींद्र खेबुडकर यांनी आज पदभार स्वीकारला. सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी शासन अनेक महत्वाकांक्षी योजना राबवित असते. या महत्वाकांक्षी योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आपला जिल्ह्याची विकासाकडे घोडदौड सुरू आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील पायाभूत सोयी सुविधांचे बळकटीकरण करण्याला मी प्राधान्य देणार आहे असेही खेबुडकर यांनी सांगितले. श्री. खेबुडकर हे यापूर्वी महाराष्ट्र विधान परिषदेचे उप सभापती यांच्याकडे खाजगी सचिव म्हणून कार्यरत होते.

जिल्हा परिषदेचे नियमित मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांची हाफकीन बायो – फॉर्मा कॉप्रोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक या पदावर बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी रवींद्र खेबुडकर यांची शासनाने नियुक्ती केली आहे. आज श्री खेबुडकर यांनी हजर होत कार्यभार स्वीकारला आहे.

रवींद्र खेबुडकर हे यापूर्वी १९९७ मध्ये सिंधुदुर्ग येथे परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यानंतर १९९९ मध्ये त्यांनी सावंतवाडी प्रांताधिकारी म्हणून देखील वैशिष्ट्यपूर्ण काम केलेले आहे. त्यामुळे त्यांना सिंधुदुर्ग जिल्हा चांगला परिचित आहे. त्यानंतर त्यांनी सन २००० साली जिल्हा पुनर्वसन अधिकारी म्हणून तर सन २००६ ते २०१२ कोल्हापूर महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरण (एमआयडीसी) येथे प्रादेशिक अधिकारी म्हणून काम केले आहे. त्यांनतर सन २०१६ ते २०१९ दरम्यान सांगली- मिरज- कुपवाड महानगर पालिकेच्या आयुक्त पदाची यशस्वी धुरा सांभाळली आहे. सन २०१९ ते २०२५ दरम्यान विधान परिषदेचे उपसभापती यांचे सचिव म्हणून देखील ते कार्यरत होते.

उल्लेखनीय कामे –

१) तिलारी प्रकल्पाच्या पुनर्वसन कामामध्ये गोवा सरकार कडून आवश्यक निधी प्राप्त झाला (१९९९)

२) विटा सांगली येथील दंगली आटोक्यात आणल्या (२००२)

३) जिल्हा पुरवठा अधिकारी सांगली असताना गैस वितरण मध्ये मागणी नोंद केल्या नंतर २४ तासाच्या आत गॅस घरपोच दिला यासाठी आदर्श गॅस वितरण प्रणाली सुरू केली (२००३ ते २००६)

४) सांगली जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप एकावेळी तपासून गैर व्यवहार केलेल्या १७ पेट्रोल पंप वर फौजदारी गुन्हे दाखल केले (२००३ ते २००६)

५) दुष्काळी परिस्थितीत २ लाख जनावरांना डहाणू ठाणे येथून ५६ रेल्वे wagan द्वारे मोफत चारा उपलब्ध करुन दिला (२००३ ते २००६)

६) कागल एमआयडीसी मध्ये अनेक उद्योगांना जमीनी देवून मोठे प्रकल्प सुरू केले (२००६ ते २०१२)

७) खंडाळा सातारा येथील मिडक मध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग आणले व स्थानिकांना नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या (२००६ ते २०१२)

८) फलटण सातारा MIDC मध्ये कमिन्स इंडियासाठी २ sez केले व मोठ्या प्रमाणात कमिन्स ची गुंतवणूक आणून विकासामध्ये हातभार लावला (२००६ ते २०१२)

९) गुलुंब वाई सातारा येथे देशात एक रसिद्ध झालेला ओढा जोड प्रकल्प सुरू केला. त्यामुळे पाझर तलाव भरला व १००० हेक्टर जमीन पाण्याखाली आली तसेच प्रत्येक वर्षाचे अनेक टॅंकर बंद झाले (२०१५)

१०) अनेक गुंडांना हद्दपार केले. (२०१४ ते २०१६)

११) सांगली मनपा मध्ये कर्मचारी भरती १००% पारदर्शी पद्धतीने केली (२०१९)

१२) मनपाच्या सेवेतील ६५० लोकांचे प्रमोशन केले (२०१९)

१३) मनपा प्रशासनातील वाईट गोष्टी बंद केल्या व शिस्त लावली (२०१६ ते २०१९)

१४) मनपा निवडणूक अत्यंत शांततेत व कायद्याच्या चौकटी प्रमाणे पार पडली (२०१८)

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles