Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय पिकुळेचा २२, २३ मार्चला सुवर्ण महोत्सव ! ; गोवा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे यांची प्रमुख उपस्थिती. ; पिकुळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळ, मुंबई व विद्यालयाचे आयोजन. प्रसिद्ध गायक अजित कडकडे यांचा गायनाचा खास कार्यक्रम.

दोडामार्ग : पिकुळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळ, मुंबई व धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय, पिकुळे ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग या शाळेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमानिमित शनिवार दि. २२ व २३ मार्च २०२५ या दिवशी भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. २२ मार्च रोजी
सकाळी आठ ते दहा वाजता ग्रंथ दिंडी – हायस्कूल ते सातेरी देवी मंदिर यामध्ये ढोल-ताशा गृप आणि शालेय लेझीम पथक, दहा ते अकरा श्री सत्यनारायणची महापूजा आणि आरती, एक ते तीन वाजेपर्यंत महाप्रसाद तीन ते विविध भजनी मंडळांची सुश्राव्य भजने, महाप्रसादआदी कार्यक्रम आयोजित केले आहे.

दुपारी नंतर साडे चार ते सहा श्री. विजयानंद नाईक (शेळपीवाडी) यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. त्यांनंतर सहा ते साडेसात मान्यवरांच्या हस्ते सांस्कृतिक कार्यक्रमाचे उ‌द्घाटन व विशेष मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे. याचे अध्यक्ष श्री. अच्युत सावंत – भोसले (संस्थापक भोसले नॉलेज सिटी), प्रमुख पाहुणे श्रीमती. कल्पनाताई प्रतापराव तोरसकर (अध्यक्षा धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई), डॉ. मिलिंद तोरसकर (कार्याध्यक्ष – धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई), श्री. आपा वसंत गवस (सरपंच पिकुळे), श्री. अनिल शेटकर (सरपंच झरेबांबर), उद्योजक श्री. विवेकानंद नाईक (वर्षा मेडिकल – दोडामार्ग), श्री. संतोषकुमार दळवी (मालक हॉटेल स्नेह रेसिडन्सी, दोडामार्ग), श्री. सुरेश दळवी (माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, माजी उपाध्यक्ष – सिंधुदुर्ग जिल्हा मध्य सहकारी बँक लि.) आदी उपस्थित राहणार आहेत.

श्री. विजय फाले यांची मिमिक्री विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम, रात्री उशिरादहा वाजता दशावतार नाटक – उदे ग अंबे उदे सादरकर्ते – श्री सिद्धिविनायक दशावतार नाट्य मंडळ, पिकुळे आदी कार्यक्रम होणार आहेत.

दिनांक २३ मार्च २०२५ रोजी सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत
महिलांसाठी हळदी कुंकू, संगीत खुर्ची आणि गायनाचा कार्यक्रम होणार आहे संध्यकाळी पाच ते साडेसात दिप प्रज्वलन, मान्यवरांची ओळख, स्वागत सत्कार मान्यवरांच्या हस्ते स्मरणिका प्रकाशन विशेष सत्कार मुर्तीचा सत्कार , पत्रकार सुहास देसाई नागरी सत्कार होणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा खासदार श्री. नारायणराव राणे (माजी मुख्यमंत्री-महाराष्ट्र राज्य तथा माजी केंद्रीय मंत्री-भारत सरकार)
प्रमुख पाहुणे ना.श्री. प्रमोदजी सावंत
मुख्यमंत्री, गोवा राज्य सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना .श्री. नितेशजी राणे आमदार श्री. दिपक केसरकर डॉ. मिलिंद तोरसकर
कार्याध्यक्ष धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई सौ. रश्मीताई मिलिंद तोरसकर (कार्यकारिणी सदस्या तथा समन्वय समिती सचिव, धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई)श्री. मोहन गुणाजी गवस (माजी प्रशासकीय अधिकारी, सिंधुदूर्ग पोलीस आणि सल्लागार सिडको, नवी मुंबई) उद्योजक श्री. विवेकानंद नाईक(वर्षा मेडिकल दोडामार्ग) श्री. नंदकुमार नाईक (सहसचिव, समन्वय समिती धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई तथा प्राचार्य न्यू इंग्लिश स्कुल व ज्युनियर कॉलेज, भेडशी)
श्री. सुहास नारायण देसाई पत्रकार तथा कनिष्ठ लिपिक, शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय,
पिकुळे ,यांचा नागरी सत्कार राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार, तसेच सहकार, युवा क्रिडा, शिक्षण आदी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मान्यवर उपस्थितीत नागरी सत्कार करण्यात येणार आहे
त्यांनतर सुप्रसिद्ध गायक श्री. अजित कडकडे यांचा गायनाचा कार्यक्रम सायकाळी साडेसात ते रात्री दहा वाजेपर्यंत होणार आहे व त्यानंतर रात्रौ साडे दहा वाजता दशावतार नाटक – ‘पातिव्रत्य तेज अर्थात महिमा शिवचक्र तीर्थाचा’श्री. देवेंद्र नाईक प्रस्तुत, चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ, चेंदवण, ट्रिकसीन नाट्य कलाकृती कार्यक्रम पिकुळे हायस्कुलचे भव्य पटांगण येथे होणार आहे तरी सर्वांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन
श्री. बबन (सावळाराम) बापू गवस अध्यक्ष पिकुळे ग्रामस्थ हितवर्धक, मंडळ मुंबई ,श्री. अशोक आंबुलकर प्र. मुख्याध्यापक शांतादुर्ग माध्यमिक विद्यालय पिकुळे ,श्री. प्रमोद शंकर गवस सचिव, श्री. रमाकांत गणू गवस खजिनदार आदींनी केले आहे तरी सर्वांनी कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन मुखाध्यापक शाळा प्रशासन वतीने करण्यात आले आहे

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles