सावंतवाडी : नॅशनल गणित ऑलिंपियाड परीक्षेत मिलाग्रीस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. कु. फ्रँकलिन फर्नांडिस, कु. हार्दिक गोवेकर, कु. सीताराम मेस्त्री, कु. रायनर डिसोझा,कु. लियोन बारदेस्कर, कु. इग्नाटीयस फर्नांडिस, कु. युगा परब, कु.अवनी पिळणकर, कु. वेदिका परब, कु. आदीश पास्ते, कु. मयुरेश मोरये, कु. अवनी सावंत, कु. झेवियर सिक्वेरा, कु. युक्ता वारंग, कु. श्रेया मेस्त्री, कु. रावी आईर, कु. सर्वेश गावडे, कु. प्रतिक देसाई, कु. सत्यम जाधव, कु. शुभंकर पाटकर, कु. हर्ष राऊळ, कु. आर्या कुडतरकर, कु. संस्कार राऊळ, कु. कृष्णा पास्ते
या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक पटकावले.
सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेचे प्राचार्य मा. फादर रिचर्ड सालदान्हा यांनी सुवर्णपदक प्रदान केले व त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी पर्यवेक्षिका श्रीम. संध्या मुणगेकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


