Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

UPSC सक्सेस स्टोरी : पहिल्याच प्रयत्नात थर्ड रँक, जाणून घ्या अनन्याच्या रेड्डी यांच्या यशाची गोष्ट.

नवी दिल्ली : तेलंगणाच्या आयएएस अधिकारी डोनुरु अनन्या रेड्डी यांना विराट कोहली यांच्याकडून प्रेरणा मिळाली आणि त्यांनी यूपीएससी परीक्षेमध्ये पहिल्याच प्रयत्नात थर्ड रँक मिळवली. अनन्या यांना यूपीएससी परीक्षेमध्ये एकूण 1065 मार्क्स मिळाले होते. ज्यापैकी लेखी परीक्षेमध्ये एकूण 875 मार्क्स मिळाले असून इंटरव्यूमध्ये (पर्सनॅलिटी टेस्ट) मध्ये 190 मार्क्स मिळवले.

यूपीएससी सिव्हिल सेवा परीक्षेमध्ये दरवर्षी हजारो मुले सहभागी होतात पण त्यांच्यापैकी फक्त काही असे असतात, जे इंटरव्यू नंतर शेवटच्या फेरीत निवडूक उमेदवारांच्या यादीत आपली जागा मिळवतात. या कारणामुळेच ही परीक्षा जगातील सर्वात कठीण परीक्षांमधील एक परीक्षा मानली जाते. यूपीएससी परीक्षा पास करणारे आयएएस-आयपीएस असे सांगतात की यामध्ये यशस्वी होण्यासाठी अभ्यासासोबतच चिकाटी आणि जबाबदारीची गरज असते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका महिला आयएएस अधिकारी यांच्या बद्दल सांगणार आहोत ज्या अशाच चिकाटी आणि जबाबदारीचे असे एक उदाहरण बनल्या आहेत. या आयएएस अधिकाऱ्याचे नाव डोनुरु अनन्या रेड्डी असे आहे.

डोनुरु अनन्या रेड्डी तेलंगणाच्या महबूबनगर येथील रहिवासी आहेत. यूपीएससी सिविल सेवा परीक्षा 2023 मध्ये त्यांनी ऑल इंडिया तिसरी रँक मिळवली होती. त्यांनी दोन वर्ष खूप कठीण प्रयत्न करून यूपीएससी परीक्षेची तयारी केली होती, ज्याचा निकाल हा काही असा आला की त्यांनी त्यांच्या पहिल्या प्रयत्नातच थर्ड रँक मिळवून त्या आयएएस अधिकारी बनल्या.

अनन्या रेड्डी यांनी कुठून शिक्षणाची सुरुवात केली?

अनन्या रेड्डी यांनी दिल्लीच्या मिरांडा हाऊस मधून त्यांचे ग्रॅज्युएशन पूर्ण केले. रेड्डी यांनी भूगोल विषयातून ग्रॅज्युएशन पूर्ण केले पण त्यांना इकॉनॉमिक्स विषयाचेही उत्तम ज्ञान होते. सर्वात जास्त आश्चर्याची गोष्ट म्हणजे रेड्डी यांनी भूगोल मधून ग्रॅज्युएशन करून व इकॉनॉमिक्स विषयाचे उत्तम ज्ञान असूनही त्यांनी या विषयांना सोडून मानवशास्त्र विषयाला पर्यायी विषय म्हणून निवडले. दिल्लीमध्ये यूपीएससी परीक्षेची तयारी करत असताना त्या भाड्याच्या एका घरात राहत होत्या. याच काळात त्या कोचिंग सुद्धा करत होत्या. तरी त्यांनी स्वअभ्यासावर जास्त भर दिला होता. त्या रोज 12 ते 14 तास अभ्यास करत होत्या आणि जशी परीक्षा जवळ आली तशा त्या अजूनही उशिरापर्यंत अभ्यास करू लागल्या होत्या.

अनन्या रेड्डी साठी विराट कोहली हे प्रेरणास्त्रोत –

अनन्या रेड्डी या क्रिकेटर विराट कोहली यांना आपले सर्वात मोठे प्रेरणास्त्रोत मानतात. त्यांनी एका इंटरव्यूमध्ये सांगितले होते की ‘विराट कोहली माझे आवडते खेळाडू आहेत आणि मला असे वाटते की त्यांच्यामध्ये एका प्रकारची प्रेरणा आणि कधी हार न मानण्याची जिद्द आहे. विराट कोहली यांची शिस्त आणि खेळ हा माझ्यासाठी एक प्रेरणास्त्रोत आहे.’ त्या सांगतात की त्यांची यूपीएससीचा अभ्यास समतोलात ठेवण्यासाठी त्या पुस्तके वाचायच्या आणि क्रिकेट पाहायच्या.

ADVT –

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles